आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi Ask ASIAN Leaders Come Up To Fight Against Terrorism

दहशतवादाला धर्माशी जोडून पाहू नका , आसियान संमेलनात मोदींचे एकत्रित लढण्याचे आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ने प्यी दौ - दहशतवादाविरुद्ध कठोर पावले उचलण्याची गरज प्रतिपादीत करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्म आणि दहशतवाद या दोन्ही बाबी जोडून पाहू नका, असे आवाहन केले. आसियान अर्थात अग्नेय आशियाई देशांच्या शिखर संमेलनात ते बोलत होते.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्यासह १८ देशांचे नेते
संमेलनात उपस्थित होते. इस्लामिक स्टेटसारख्या दहशतवादी संघटनेबाबत आसियानच्या जाहीरनाम्याला भारताचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट करून या देशांनी दहशतवादाचा धोका ओळखून प्रत्येक वेळी एकत्रित येण्याची गरज मोदींनी प्रतिपादीत केली.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव, चीचे पंतप्रधान ली केकियांग यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांशी झालेली ही त्यांची पहिलीच भेट होती. याशिवाय फिलिपिन्सचे राष्ट्रपती बेनिग्नो अकिनोंसह इतर नेत्यांचीही मोदींनी भेट घेतली.
आव्हाने वाढली
आज जगभरात दहशतवाद हे एक प्रमुख आव्हान ठरत आहे. वरचेवर हे आव्हान वाढत चालले आहे. मादक पदार्थांची तसेच शस्त्रास्त्रांची तस्करी आणि काळा पैसा यामुळे दहशतवादाला खतपाणी घातले जात असल्याचे मोदी यांनी नमूद केले.
मी नाही पत्र लिहिले
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मोदींना पत्र पाठवून काठमांडूमध्ये २५ नोव्हेंबरपासून होत असलेल्या सार्क देशांच्या शिखर परिषदेत भेटीची इच्छा व्यक्त केली असल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले होते. यावर स्पष्टीकरण देताना शरीफ यांनी आपण असे कोणतेही पत्र मोदींना लिहिले नसल्याचे म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये ‘मोदी एक्स्प्रेस’!
मेलबर्न - गेल्या २८ वर्षांच्या खंडानंतर ऑस्ट्रेलियाच्या दौ-यावर जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असून १७ नोव्हेंबरला त्यांच्या उपस्थितीत आयोजित जाहीर कार्यक्रमासाठी विशेष ‘मोदी ट्रेन’ धावणार आहे. मेलबर्न ते सिडनी या मार्गावर धावणा-या या रेल्वेत मोदी ढोकळा, मोदी फाफडा यासह अनेक व्यंजनांचा आस्वाद प्रवाशांना घेता येईल.
रविवारी चार बोगी असलेली ही रेल्वे सुमारे २२० प्रवाशांना घेऊन जाईल. सोमवारी भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन नागरिकांसमोर मोदींचे भाषण होणार असून त्या कार्यक्रमासाठी हे लोक रेल्वेने जातील. एखाद्या भारतीय पंतप्रधानाने ऑस्ट्रेलियात केलेले हे पहिले जाहीर भाषण ठरेल. मोदी एस्प्रेसची सर्व व्यवस्था ‘ओव्हरसिज फ्रेन्डस् ऑफ बीजेपी’ या संस्थेने केली आहे. या रेल्वेत अनेकांनी जागा आरक्षित केली असल्याचे संस्थेच्या मेलबर्न शाखेचे प्रवक्ते अश्विन बोरा यांनी सांगितले.
मोदी १५ नोव्हेंबरला जी-२० परिषदेसाठी ब्रिस्बेनला जात असून १७ नोव्हेंबरला जाहीर सभेत ते भाषण करतील.
खास सजावट
मोदी एक्स्प्रेसची सजावटही अफलातून असेल. रंगबेरंगी फुगे, पोस्टर्स आिण भारतातील काही महत्त्वाच्या
ठिकाणांची छायाचित्रे या रेल्वेत असतील. याशिवाय मोफत भोजनाची व्यवस्था यात आहे. हा एक वेगळा अनुभव असेल, असे बोरा म्हणाले.