आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्राध्यक्ष थीन सिन-मोदी चर्चा, पंतप्रधान म्यानमार दौ-यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाय पेई तॉ - आशियान परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौ-यावर असून मंगळवारी ते म्यानमारमध्ये दाखल झाले. मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष थीन-सिन यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष भवनात सिन यांच्याशी त्यांची बैठक झाली.

येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी मोदी यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे अतिशय उत्साहात स्वागत झाले. यावेळी शालेय विद्यार्थी पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. लष्कराच्या वतीने सलामी देण्यात आली.

मोदी-सिन यांच्यात सुमारे ४५ मिनिटांची चर्चा झाली. सांस्कृतिक, वाणिज्य यासह विविध क्षेत्रातील दोन्ही देशांचा संपर्क वाढवण्यावर उभय नेत्यांमध्ये सहमती झाली. म्यानमानमध्ये दाखल होताच येथे अतिशय चांगले स्वागत झाले, असे मोदींनी ट्विट करून सांगितले.
४० नेत्यांशी चर्चा
आशियान परिषद भारतासाठी अतिशय महत्वाची आहे. कारण परिषदेच्या व्यासपीठावर ४० आंतरराष्ट्रीय नेत्यांशी चर्चा करण्याची संधी आहे. द्विपक्षीय पातळीवर ही चर्चा होणार असल्याने त्याचा फायदा भारताला होणार आहे, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे.