आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी एक्स्प्रेस: अमेरिकेप्रमाणेच ऑस्ट्रेलियात भारतीयांसमोर आज मोदींचे भाषण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेन - ऑस्ट्रेिलया दौर्‍यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिडनीत भारतीय समुदायासमोर जाहीर भाषण करणार आहेत. भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता सिडनीतील ऑलिम्पिया ग्राऊंडवर हा कार्यक्रम होणार आहे. मोदींचे भाषण ऐकण्यासाठी ऑस्ट्रेलियातील भारतीयांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

मेलबर्न ते सिडनी मोदी एक्स्प्रेस
अमेरिकेप्रमाणेच येथेही त्यांच्या भाषणाचे चांगलेच आकर्षण पाहायला मिळाले असून त्यासाठी मेलबर्न ते सिडनी अशी विशेष रेल्वे रविवारी धावली. सोमवारी ती सिडनीला पोहचेल. प्रवासात भारतीय वंशाचे अनेक उत्साही नागरिक सहभागी झाले होते. त्यात महिला, लहान मुलांचाही समावेश होता. मोदी यांचे छायाचित्र असलेले टी-शर्ट परिधान केलेले प्रवासी सिडनीच्या रेल्वेस्थानकावर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

2 ऑक्टोबरला पोरबंदरमध्ये नव्या युगाचाच जन्म
सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी ब्रिस्बेनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या वेळी उपस्थित असलेल्या प्रवासी भारतीयांसमोर बोलताना मोदी म्हणाले, "2 ऑक्टोबरला पोरबंदरमध्ये कुण्या माणसाचा नव्हे, एका नव्या युगाचाच जन्म झाला होता. आजही महात्मा गांधी तेवढेच प्रसंगोचित आहेत.' महात्मा गांधींची तत्त्वे जगाला कळाली तर आज हे जग खूप वेगळे असले असते, असेही मोदी म्हणाले.

(हे पण वाचा - 15 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात साकार झाले नरेंद्र मोदींचे स्वप्न )

महात्माजींचा हा पुतळा ब्रिस्बेनच्या रोमा स्ट्रिट पार्कलँडमध्ये उभा करण्यात आला आहे.
मोदी म्हणाले, काही लोक माझ्यावर नेहमी आरोप करतात की, पंतप्रधान झाल्यावर मोदी आता सतत गांधी-गांधी करत आहेत; परंतु, मी मुख्यमंत्रीही नव्हतो तेव्हा ब्रिस्बेनला आलो होतो. तेव्हाही मी हेच बोललाे होतो.
आज (सोमवार) सिडनीमध्ये भारतीय समुदायासमोर ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मोदी एक्स्प्रेसने प्रवासी भारतीय निघाले सिडनीला