आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • PM Modi May Use Military Option If Terror Attack Traced To Pak Says Ex US Ambassador

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'भारतावरील हल्ल्यात पाकचा हात असल्यास, मोदी पाकवर हल्ला करतील'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - यापुढे भारतात झालेल्या एखाद्या दहशतवादी हल्ल्यात पाकचा हात असल्याचे पुरावे मिळाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी लष्करी कारवाई करायला मागे-पुढे पाहणार नाहीत. अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत रॉबर्ट ब्लॅकविल यांनी पाकिस्तानला हा इशारा आणि सावधगिरीचा सल्लाही दिला आहे.

पूर्वीचे दिवस राहिले नाहीत हे पाकिस्तानने लक्षात घेणे आवश्यक आहे, असा सल्ला देत ब्लॅकविल म्हणाले, भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्याला १५ वर्षे होत आहेत. जेव्हा कधी भारतात दहशतवादी कारवाया झाल्या त्या प्रत्येक वेळी तत्कालीन पंतप्रधानांनी पाकिस्तानविरुध्द लष्करी कारवाईचा फक्त विचार केला. कारवाई केली नाही. मात्र, आता भारतातील परिस्थिती बदलली आहे. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र माेदी अशा कारवाईपासून मागे हटणार नाहीत.

मोदींचे व्यक्तिमत्त्वच तसे आहे...
ब्रुकिंग्ज इन्स्टिट्यूटचे ज्येष्ठ अभ्यासक स्टीफन कोहेन यांनीही ब्लॅकविल यांच्या विचाराला सहमती दर्शवली. मुंबई हल्ल्यासारख्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता आता कमी असली तरी हल्ला झालाच तर भारत संपूर्ण ताकदीनिशी प्रत्युत्तर देईल. याचे कारण म्हणजे मोदींचे व्यक्तिमत्त्वच तेवढे आक्रमक आहे. शिवाय, भारतातील जनमत आणि राजकीय स्थिती त्यांना पाठबळ देऊ शकते, असे कोहेन यांनी म्हटले आहे.