आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi Out Person Of The Year, Final Eight Candidates Name Listed

‘पर्सन ऑफ द इयर’ स्पर्धेतून नरेंद्र मोदी ‘टाइम’ आऊट! अंतिम यादीत आठ उमेदवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - टाइम नियतकालाच्या ‘पर्सन ऑफ द इयर’ स्पर्धेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर फेकले गेले आहेत. ८४ वर्षानंतर दुस-या भारतीयाला हा सन्मान मिळण्याची शक्यता होती. मात्र सोमवारी टाइमच्या संपादकीय पॅनलने तयार केलेल्या अंतिम आठ जणांच्या यादीत मोदींच्या नावाचा समावेश नाही. त्यातूनच एक जण टाइम पर्सन ऑफ द इयर घोषित होईल. त्याची घोषणा बुधवारी होईल. मोदी रीडर्स पोलमध्ये पर्सन ऑफ द इयर ठरले.

अंतिम आठ जण
- अलिबाबाचे प्रमुख जॅक मा
- इबोला नर्सिंग स्टाफ
- रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन
- अ‍ॅपलचे सीईओ टीम कुक
- फर्ग्युसनचे आंदोलक
- गायिका टेलर स्विफ्ट
- नॅशनल फुटबॉल लीगचे रॉजर गुडेल
- कुर्दीश नेते मसूद बरजानी