आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वर्षाच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इंग्लंड दौरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या अधिक असलेल्या देशांचा दौरा करण्याचा सिलसिला नवीन वर्षातही पाहायला मिळणार असल्याचे दिसते. त्याची सुरुवात ब्रिटन भेटीने होऊ शकते.

ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकाही वर्षाच्या सुरुवातीलाच होणार आहेत. त्यामुळे मोदी निवडणुकीच्या अगोदर जातील की नंतर, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. म्हणूनच दौ-याचे वेळापत्रक अद्याप तयार झालेले नाही. पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांचा कार्यकाळ मार्च २०१५ मध्ये संपणार आहे. त्या अगोदर ब्रिटनमध्ये निवडणूक होणे अपेक्षित आहे. कॅमरून पुन्हा बहुमताने सत्तेवर येतील, हे आताच सांगता येणार नाही. त्यामुळेच मोदींचा दौरा जानेवारी-फेब्रुवारीत व्हावा, असे ब्रिटनच्या पंतप्रधानांना वाटते. दुसरीकडे परराष्ट्र मंत्रालयाला मात्र मोदींचा दौरा नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर व्हावा, असे वाटते.

मोदी यांना कॅनडा, जर्मनी दौ-याचेही निमंत्रण आहे. परंतु इंग्लंडमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या तुलनेने अधिक असल्याने मोदी या दौ-याला प्राधान्य देण्यास इच्छुक आहेत. दरम्यान, गेल्या चार वर्षांत कॅमरून यांनी दोन वेळा भारत दौरा केला.

मोदी सरकारकडून मोठ्या अपेक्षा
मोदी सरकारने संरक्षण क्षेत्र थेट परदेशी गंुतवणुकीसाठी खुले करून दिले आहे. अशा परिस्थितीत ब्रिटनला भारतासोबतचे संबंध दृढ करण्याची इच्छा आहे. यासंबंधीचे एक जाणकार ‘दैनिक भास्कर’शी बोलताना म्हणाले, भाजपचे नवीन सरकार वेगाने निर्णय घेऊ लागले आहे. मोदींच्या कार्यकाळात उभय देशांत काही करार झाल्यास ब्रिटनला आर्थिक पातळीवर तेजी येईल. म्हणूनच निवडणुकीपूर्वी भेट द्यावी, असे कॅमरून यांना वाटते.