आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi Addresses Australian Parliament

ऑस्ट्रेलियाच्या संसदेत प्रथमच भारतीय पंतप्रधानांचे भाषण, सचिन-ब्रॅडमनचा उल्लेख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅनबेरा - ऑस्ट्रेलियाच्या संसदेत पंतप्रधान टोनी अॅबॉट यांनी नरेंद्र मोदींचे मनापासून स्वागत केले. ते म्हणाले, मोदी ऑस्ट्रेलियात येण्याआधीपासून त्यांच्याबद्दलची क्रेझ येथे पाहायला मिळाली. भारतात निवडणुकीत त्यांनी मिळविलेले यश हे स्तंभीत करणारे आहे. टोनी अॅबॉट म्हणाले, मोदींचे ऑस्ट्रेलियात ज्या प्रमाणे स्वागत झाले तसे दुसर्‍या कोणत्या नेत्याचे झालेले नाही. मोदींना भेटण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक ठिकाणाहून लोक आले होते. जवळपास 28 वर्षांनंतर एखादे भारतीय पंतप्रधान ऑस्ट्रेलियाच्या संसदेत आले होते. मोदींच्या आधी माजी पंतप्रधान राजीव गांधी ऑस्ट्रेलियात आले होते. मोदींकडून आम्ही राजकारणाचे धडे घेतले पाहिजे. पंतप्रधान अॅबॉट यांनी गुजरातच्या विकासाचेही कौतूक करताना म्हणाले, मोदींनी गुजरातचा चेहराच बदलून टाकला आहे. आता ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या वाढत्या संबंधातून विकासाचा नवा मार्ग सापडेल.
विरोधी पक्षनेत्यांनी मोदी आणि द्रविडवर उधळली स्तुतिसुमने
ऑस्ट्रेलिया संसदेतील विरोधी पक्षनेते हॉल बिल शॉटन यांनीही संसदेत मोदींची स्तुती केली. ते म्हणाले, मोदींची भारतासह ऑस्ट्रेलियामध्येही क्रेझ आहे. शॉटन यांनी क्रिकेटपटू राहुल द्रविडवर देखील स्तुतिसुमने उधळली. ते म्हणाले, द्रविड सारखा शालीन खेळाडू हा भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवितो. भारतातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राबद्दलही त्यांनी गौरोवदगार काढले.
मोदींनी केला सचिन, शेन वॉर्न आणि ब्रॅडमनचा उल्लेख
ऑस्ट्रेलियाच्या संसदेला संबोधित करताना मोदी म्हणाले, 'मी भारतातील तिसर्‍या क्रमांकाचा व्यक्ती आहे. ऑस्ट्रेलियात ज्या प्रमाणे टोनी अॅबॉट यांनी माझे स्वागत केले त्यामुळे मी भारावून गेलो आहे.' विनोदी स्वरुपात पुढे ते म्हणाले, जोपर्यंत ऑस्ट्रेलियाकडे स्पीड होती तोपर्यंत आम्ही ऑस्ट्रेलियासाठी वेडे होतो, मात्र शेन वॉर्नने आम्हाला खोटे ठरवले. सचिन तेंडुलकरचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, 'सचिन तेंडुलकरमुळे संपूर्ण जग भारताचे चाहते झाले आहे.'
ऑस्ट्रेलियाच्या लोकशाहीतून आम्हाला शिकण्यासारखे खूप काही आहे. ऑस्ट्रेलियात 4.5 लाख भारतीय आहेत. दोन्ही देशातील संबंध वाढले तर सर्वांनाच त्याचा फायदा होईल. जी 20 शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल मोदींनी अॅबॉट यांचे अभिनंदन केले. त्याच बरोबर सचिन आणि तेडुलकरचा उल्लेख केला.