आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्युयॉर्कमध्ये मोदींच्या स्वागतावर होणार 7 कोटी खर्च, अमेरिकेतील भारतीयांचा पुढाकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल फोटो- पंतप्रधान नरेंद्र मोदी.)
वॉशिंग्टन- पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या भव्य स्वागताची तयारी आताच सुरू झाली आहे. अमेरिकेत मोदींच्या स्वागत समारंभावर 7 कोटी 20 लाख रुपये खर्च होण्याची शक्यता आहे.
न्युयॉर्कच्या प्रसिद्ध मेडिसन स्वेअर गार्डन (एमएसजी) परिसरात होणारा स्वागत समारंभ एखादी विशिष्ट संघटना किंवा समुदायाचा पुढाकाराने नव्हे तर स्वागत समितीच्या मार्गदर्शनाखाली व्हावा, असे पंतप्रधान कार्यालयाने आधीच सांगितले आहे. 28 सप्टेंबर रोजी मोदी येथे अनिवासी भारतीयांना संबोधित करणार आहेत.
शिकागोत आयोजित करण्यात आलेल्या स्वागत समारंभासाठी गठित करण्यात आलेल्या समितीवर नरेंद्र मोदी यांचे मित्र भरत बरैई यांची पंतप्रधान कार्यालयाने नियुक्ती केली आहे.
2003 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा भाजपच्या अमेरिकेतील समर्थकांनी स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. ग्लोबल इंडियंस फॉर भारत विकास, बोस्टनमधील विश्व हिंदू परिषद, न्युयॉर्कमधील भारतीय संघटना आदी संस्थांनी या कार्यात पुढाकार घेतला होता. 15 ऑगस्टला न्युयॉर्कमध्ये ही संघटना ध्वजवंदनासह परेडही आयोजित करीत असते.
आरएसएसचे कार्यकर्ते असताना झाली होती मोदींची बरैई यांच्यासोबत मैैत्री...वाचा पुढील स्लाईडवर