आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • PM Narendra Modi And His Japanese Counterpart Will Hold Formal Talk On Many Issues

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जपान दौरा: नो न्‍यूक्‍ल‍िअर डील, \'बुलेट ट्रेन\'चे मोदींचे स्वप्न पूर्ण करणार जपान!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: शिखर वार्तानंतर जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्याशी हस्तांदोलन करताना नरेंद्र मोदी)
टोकियो- भारतात बुलेट ट्रेन चालवण्यास सहकार्य करण्यास जपानने सहमती दर्शवली आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बुलेट ट्रेनचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. नरेंद्र मोदींचा जपान दोर्‍याचा आजचा तिसरा दिवस आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि नरेंद्र मोदी यांच्यात आज शिखर वार्ता झाली. भारत सरकारला पूर्ण सहकार्य करणार असल्याची जपान सरकारने हमी दिली. परंतु, न्यूक्लिअर कराराबाबत कोणती चर्चा न झाल्याची माहिती मिळाली आहे.

शिखर वार्तामधील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे...
- जपान आगामी पाच वर्षांत भारतात 35 ब‍िलि‍यन डॉलर्स (जवळपास 2 लाख 10 हजार कोटी रुपये) गुंतवणार आहे. सार्वजनिक आणि खासजी‍ क्षेत्रात ही गुंतवणूक असेल. यातील काही निधी वाराणसीतील प्रवित्र 'गंगा स्वच्छता मोहिमेवर खर्च केला जाणार आहे.

- शिखर वार्तादरम्यान जपान आणि भारतामध्ये 'स‍िव्हिल न्‍यूक्‍ल‍िअर डील' होऊ शकली नाही. परंतु भविष्यात या मुद्यावर चर्चा सुरुच राहील.

- भारतात बुलेट ट्रेन चालवण्यासाठी जपान आर्थिक आणि तांत्रिक साहाय्य करणार आहे.

- जपान निर्मित यूएस2 एयरक्राफ्ट्सच्या खरेदीबाबत चर्चा नाही.

- दोन्ही देशांच्या चर्चेदरम्यान दहशतवाद, महिला सशक्‍तीकरण, उद्योग आणि शिक्षण याशिवाय अनेक मुद्यावर चर्चा झाली.

- जपानमधील अनेक भारतीय कंपन्यांवरील बंदी उठवणार
नरेंद्र मोदींनी जापानच्या उद्योगपतींना संबोधित केले. जपान चेंबर ऑफ कॉमर्समध्ये हिंदीतून केलेल्या भाषणात मोदींनी दोन्ही देशांत सहकार्य वाढवण्याचा मुद्दा मांडला. तसेच आपल्या सरकारच्या 100 दिवसांच्या कामाचा उल्लेख करत सकारात्मक सुरुवात असल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी मोदींनी एका शाळेला भेट देऊन शिक्षणपद्धतीचा आढावाही घेतला होता. आज पंतप्रधान शिंजो आबे यांच्याशी ते चर्चा करणार आहेत.

100 दिवसांच्या कामाचा उल्लेख
मोदी म्हणाले की, गेल्या 100 दिवसांदरम्यान त्यांच्या सरकारने उचललेल्या पावलांचा सकारात्मक परिणाम झाला आहे. ते म्हणाले, आम्ही पंतप्रधान कार्यालय अधिक उपयोगी बनेल असा प्रयत्न केला आहे. तसेच आम्ही बजेट, संरक्षण आणि रेल्वे क्षेत्रात अनेत नवीन पावले उचलली आहेत.जपानशी सहकार्याचा मुद्दा
मोदींनी आपल्या भाषणात जपानच्या सहकार्याची भरपूर वकिली केली. ग्रीन एनर्जी आणि क्लीन एनर्जीसाठी जपानक़डून सहकार्य घेऊ आणि सहकार्य करू असे मोदी म्हणाले. स्किल डेव्हलपमेंटच्या दिशेने भारत जपानच्या बरोबरीने काम करण्यास इच्छुक आहे. 21 वे शतक आशिया खंडाचे असेल हे सर्वांनाच माहीत आहे.त्यामुळे भारत जपान सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. दोन्ही देशांतील नाते खूप जुने आहे. त्यामुळे अपेक्षा स्वाभाविक असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.

उद्योगपतींना आश्वासन
मोदींनी जपानच्या उद्योगपतींना भारतात गुंतवणुकीसाठी आमंत्रण दिले. पंतप्रधान कार्यालयात 'जपान प्लस' नावाची एक टीम तयार करणार असून ही टीम जपानशी संबंधीत मुद्दे सांभाळेल असेही मोदी म्हणाले. तसेच मोदींनी यावेळी बारतात जपानी बँकेलाही परवागनी दिली.
क्‍योटोमध्ये रविवारी बौद्ध मंदिरांचे दर्शन घेऊन महापौरांकडून स्मार्टसिटी संदर्भात टिप्स घेतल्यानंतर रविवारी सायंकाळी मोदी टोकियाला पोहोचले.

मोदी - आबे यांच्यात चर्चा
दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, अणु करार आणि पायाभूत सोयी सुविधांच्या क्षेत्रात सहकार्याचा मुद्दा महत्त्वाचा असेल. त्याशिवाय दुर्मिळ खनिजे क्षेत्रात सहकार्य, भारतात बुलेट ट्रेनसाठी मदत, समुद्रात वाहतुकीची क्षमता असणा-या अ‍ॅम्फीबियस विमानांसंदर्भातही करार होण्याची अपेक्षा आहे. भारत आणि जपानमध्ये 'टू प्लस टू' नावाच्या एका संरक्षण धोरणाची सुरुवात करण्याच्या मुद्यावरही एकमत होण्याची शक्यता आहे.त्यात दोन्ही देशांच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांचा समावेश असेल.

जपानबरोबर व्यापार वाढवणे आणि तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान यावरही भारताचा जोर असेल. भारताला संरक्षण क्षेत्रात जपानचे सहकार्य अपेक्षित आहे. 49 टक्के एफडीआयच्या मुद्यावर अनेक अमेरिकन कंपन्यांनी नाक मुरडल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत जपानच्या कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करू शकतात. त्यातून भारतीय बाजारपेठ व्यापाराच्या दृष्टीने सुरक्षित असल्याचा संदेश देणे हा उद्देश त्यामागे आहे.

मोदी बनले शिक्षक
मोदींनी टोकियामध्ये एका शाळेचाही दौरा केला. येथे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मोदी जपानच्या शिक्षणपद्धतीची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यांनी त्याचे तोंडभरुन कौतुकही केले. भारत जपानी भाषा शिकायला उत्सुक असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी जपानी शिक्षकांना भारतात येण्याचे आमंत्रणही दिले.
पुढील स्लाइड्सवर पाहा मोदींच्या जपान दौ-याचे काही PHOTO