आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • PM Narendra Modi Arrives In New York For A Five Day Visit News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: नरेंद्र मोदींचे अमेरिकेत जंगी स्वागत, न्युयॉर्क पॅलेसबाहेर \'मोदीमय\' वातावरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: न्यूयॉर्क पॅलेस हॉटेलबाहेर चाहत्यांना अभिवादन करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी)
न्यूयॉर्क- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एअर इंडियाच्या विशेष विमानाने न्यूयॉर्कमध्ये पोहोचले आहेत. जॉन एफ कॅनेडी आंतरराष्‍ट्रीय एअरपोर्टवर मोदींची जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय दुतावासातील अधिकारी उपस्थित होते. नरेंद्र मोदी अमे‍रिकेत पाच दिवसीय दौर्‍यावर आले आहेत. नरेंद्र मोदींच्या 100 तासांच्या अमेरिका दौर्‍यादरम्यान जवळपास 50 कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे.

नरेंद्र मोदी एअरपोर्टवरून थेट हॉटेल न्यूयॉर्क पॅलेसमध्ये पोहोचले. हॉटेलबाहेर मोदींच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. मोदी हॉटेलजवळ आल्यानंतर 'मोदी- मोदी' अशा घोषणा करून चाहत्यांनी मोदींचे स्वागत केले. मोदींनी हात दाखवून सगळ्यांना अभिवादन करून हॉटेलमध्ये प्रवेश केला. न्यूयॉर्क हॉटेल बाहेरील वातावरण 'मोदीमय' झाले होते.

असा असेल नरेंद्र मोदींचा कार्यक्रम...
26 सप्टेंबर (शनिवार)

>अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची औपचारिक भेट
>संयुक्त राष्ट्र महासभेच्या 69 व्या सत्राला उपस्थिती आणि भाषण
>9/11 हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण

28 सप्टेंबरला (रविवार)
सकाळी नऊ वाजता अमेरिकेतील यहूदी समुदायाच्या प्रत‍िनिधींची भेट
सव्वा अकराला भारतीय मेडिसन स्केअर गार्डनमध्ये आयो‍जित सभेत भाषण

29 सप्टेंबर (सोमवार)
>सकाळी साडे सात वाजता अमेरिकेतील विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसोबत बैठक
>अकरा वाजता माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि त्यांची पत्नी हिलेरी क्लिंटन यांच्यासोबत नास्ता
>दुपारी तीन वाजता 'काउंसिल फॉर फॉरेन रिलेशन'या बैठकीत भाषण
>सायंकाळी सात वाजता व्हाइट हाऊसमध्ये बराक ओबामा यांनी आयोजित केल्याल्या डिनर पार्टीत सहभाग

30 सप्टेंबर (मंगळवार)
>वॉशिंग्टनसाठी सकाळी रवान होतील.
>सकाळी 11 वाजता ओव्हल ऑफिसला भेट
> सव्वा बाराला संसदेचे कनिष्ट सभागृह 'हाऊस ऑफ रिप्रजेंटेटिव्ह'चे अध्यक्ष जो बोएनर यांच्यासोबत मोदी चहापान यावेळी 50 पेक्षा जास्त अमेरिकन खासदारांसोबत चर्चा करतील.

याशिवाय नरेंद्र मोदी वॉशिंग्टनमध्ये इंडो यूएस बिझनेस चेम्बर्सच्या कार्यक्रमात सार्वजनिक भाषण देतील आणि अमेरिकन उद्योगजगतील मान्यवरांसोबत संवाद साधतील. तसेच यहूदी आणि कॅनेडातील शिख समुदायांच्या प्रतिनिधींशीही चर्चा करणार आहेत.

आपल्या अमेरिका दौर्‍यात बोइंग, ब्लॅक रॉक, आयबीएम, के.के.आर, गोल्ड मॅन सॅच आणि जनरल इलेक्ट्रिकल्स या सहा प्रमुख कंपन्यांच्या सीईओंशी स्वतंत्र बैठका घेतील. याशिवाय गुगल, कार्ली ग्रुप, कारगिल सिटी ग्रुप, मास्टर कार्ड पेगिस्कों, होस्पेरा अशा अकरा प्रमुख कंपन्यांच्या प्रमुखांसोबत सामुहिक चर्चा करतील.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, न्यूयॉर्कमध्ये पोहोचलेल्या नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे... अन्य तस्वीरें।