आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीजींच्या रूपाने नवे युग अवतरले; ब्रिस्बेनमध्ये गांधींच्या पुतळ्याचे अनावरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेन- सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी ब्रिस्बेनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या वेळी उपस्थित असलेल्या प्रवासी भारतीयांसमोर बोलताना मोदी म्हणाले, "२ ऑक्टाेबरला पोरबंदरमध्ये कुण्या माणसाचा नव्हे, एका नव्या युगाचाच जन्म झाला होता. आजही महात्मा गांधी तेवढेच प्रसंगोचित आहेत.' महात्मा गांधींची तत्त्वे जगाला कळाली तर आज हे जग खूप वेगळे असले असते, असेही मोदी म्हणाले.
महात्माजींचा हा पुतळा ब्रिस्बेनच्या रोमा स्ट्रिट पार्कलँडमध्ये उभा करण्यात आला अाहे. मोदी म्हणाले, काही लोक माझ्यावर नेहमी आरोप करतात की, पंतप्रधान झाल्यावर मोदी आता सतत गांधी-गांधी करत आहेत; परंतु, मी मुख्यमंत्रीही नव्हतो तेव्हा ब्रिस्बेनला आलो होतो. तेव्हाही मी हेच बोललाे हाेतो.

१. ग्लोबल वॉर्मिंग : निसर्गाच्यारक्षणार्थ गांधीजींचे जीवन
आजजगासमोर दोन संकटे आहेत. एक ग्लोबल वॉर्मिंग आणि दुसरे दहशतवाद. गांधीजींच्या मार्गावर हे जग चालले असते तर या समस्या आज उद््भवल्याच नसत्या. निसर्गाचे शोषण करण्याची मानवी प्रवृत्ती आहे. महात्मा गांधी यांनी जीवनभर पर्यावरण संरक्षणाची शिकवण दिली.

२.शांती : गांधीजींच्यास्वप्नाची शक्ती आज कळाली
गांधीजींच्याअहिंसेचे तत्त्व या जगाने अंगीकारले असते तर आज समस्याच उद््भवल्या नसत्या. आपणच शक्तिशाली असल्याचे सिद्ध करण्यासाठी आज प्रत्येक जण सरसावला आहे. ही शक्ती दाखवण्यासाठी शस्त्रांचा आधार घेत आहे. आता फक्त गांधीजींचे तत्त्वच या जगाला वाचवू शकते.

३.पाणी : वायाघालवले तर बापूजींना राग येत असे...
बापू साबरमती आश्रमात असताना नदी खळाळून वाहत असे. तरीही कोणी त्यांना गरजेपेक्षा अधिक पाणी दिले तर बापू त्याला रागवत असत. पाणी वाया का घालवतोस म्हणून विचारणा करत. कुणाला गरज असेल तर तो पुन्हा पाणी मागेल, असे बजावत. बापू लिफाफ्याच्या मागच्या बाजूने लिहीत असत. अधिक कागद वाया घालावला, तर अधिक वृक्षतोड होईल, ही त्यांची धारणा होती.

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या जी-२० परिषदेत भारताला मोठे यश मिळाले अाहे. समूहातील देशांनी काळ्या पैशांबाबत भारताच्या भूमिकेला पाठिंबा देत करविषयक माहितीचे आदानप्रदान पारदर्शकेतला अनुमोदन दिले.

विशेष म्हणजे परिषदेच्या मसुद्यात या मुद्द्याचा समावेश नव्हता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिल्यामुळे जगाने तो स्वीकारला. परिणामी जी-२० देशांच्या संयुक्त निवेदनात करविषयक पारदर्शकतेच्या मुद्द्याचा समावेश करण्यात अाला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ब्रिस्बेनमधील रोमा स्ट्रील पार्कलँडमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मोदी रोमा स्ट्रीट पार्कलँडला पोहोचले तेव्हा २०० हून अधिक भारतीय तेथे होते. अनेक भारतीय मुलांना घेऊन आले होते.
मेलबर्न ते सिडनी मोदी एक्स्प्रेस : सिडनीऑस्ट्रेलियात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे येथे भाषण होणार आहे. अमेरिकेप्रमाणेच येथेही त्यांच्या भाषणाचे चांगलेच आकर्षण पाहायला मिळाले असून त्यासाठी मेलबर्न ते सिडनी अशी विशेष रेल्वे रविवारी धावली. सोमवारी ती सिडनीला पोहचेल. प्रवासात भारतीय वंशाचे अनेक उत्साही नागरिक सहभागी झाले होते. त्यात महिला, लहान मुलांचाही समावेश होता. मोदी यांचे छायाचित्र असलेले टी-शर्ट परिधान केलेले प्रवासी सिडनीच्या रेल्वेस्थानकावर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

पुढील स्लाइड्‍सवर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याचे फोटो...