आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • PM Narendra Modi Japan Vist News In Marathi, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जपानमधील भारतीयांनी पंतप्रधान मोदी यांचे केले स्वागत, विद्यार्थ्‍यांशी साधला संवाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो - जपान दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मंगळवारी ( ता. दोन) येथील भारतीयांनी मेजवानीचे आयोजन केले होते. याचा मोदींनी पूरेपूर आनंद लुटला. येथे त्यांनी मुलांबरोबर वंदे मातरम हे गीत गायले आणि 'भगवत गीता' चे नि‍मित्त करुन विरोधी पक्षांना लक्ष्‍य केले. या कार्यक्रमात त्यानी स्वच्छ भारत या संकल्पनेवर जोर दिला.
मोदींनी सांगितले, आपण 2019 मध्‍ये गांधीजींची 150 वे जन्मदिवस साजरा करणार आहोत. यानिमित्त 2019 पर्यंत भारताची प्रतिमा सुधारण्‍याचे वचन आपण महात्मा गांधींना देऊ.

* पर्यटन वाढवण्‍यावर जोर
प्रत्येकांनी प्रत्येक वर्षी 5 जपानी कुटूंबांना भारतात जाण्‍यास उद्युक्त करावे. भारत सरकार पर्यटन वाढवण्‍यासाठी जे करु शकत नाही ते तुम्ही करु शकता. याने भारतात पर्यटन वाढेल आणि देशात रोजगार वाढेल, असे पंतप्रधानने उपस्थित भारतीयांना आवाहन केले.

* माऊस हलवले की जग हलते
मी तैवानला गेलो होतो. तेथील लोकांनी मला एक प्रश्‍न विचारला, भारत आजही गारुड्यांचा देश म्हणून ओळखला जातो का ? त्याला मी उत्तर दिले, आज आम्ही माऊसबरोबर खेळत आहोत. आता आम्ही माऊस हलवले की संपूर्ण जग हलते.

तत्पूर्वी मोदींनी उद्योगपती आणि विद्यार्थ्‍यांची भेट घेतली. जपानने भारतावर फोकस करावे,असे मोदींनी उद्योगजगताला आवाहन केले.

मंगळवारी पंतप्रधानांनी वेगवेगळ्या उपस्थिती लावली. टोकिओ स्टॉक एक्सजेंजमधील 2 हजार लोकांना संबोधित करताना मोदी म्हणाले, भारत लुक ईस्ट धोरणावर लक्ष्‍य केंद्रीत करत आहे. जपानने लुक अॅट इंडिया धोरणाचा स्वीकारावे, असे आम्हाला वाटते. भारतात रेड टेप नव्हे, रेड कार्पेट तुमची वाट पाहात आहे. देशात 50 पेक्षा जास्त शहरे मेट्रो रेल्वेची वाट पाहात आहे. त्यामुळे भारतमध्‍ये गुंतवणूक करा, असे आवाहन मोदींनी जपानी उद्योग जगताला केला आहे.

चीनवर विचारलेल्या प्रश्‍न मोदींनी टाळले
सेक्रेट हार्ट विद्यापीठात मोदी गेले होते. त्यांना एक विद्यार्थ्‍यांने चीनवर प्रश्‍न विचारला होता. त्याचे उत्तर न देता मोदींनी भारत-जपान संबंधावर जोर दिला.

साइन्स ऑफ थिंकिंग आणि आर्ट ऑफ लिव्हिंगची गोष्‍ट
तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली, तरी मानवी संवदेनेविना ते अशक्य आहे. यामुळेच मी म्हणतो की, साइन्स ऑफ थिंकिंग आर्ट ऑफ लिव्हिंग या दोन्हींचे आयुष्यात मिश्रण हवे.

माझ्या कॅबिनेटमध्‍ये 25 टक्के महिला मंत्री
भारतातील महिला समक्षीकरणावर बोलताना मोदींना स्वत:चीच प्रसंशा केली. ते म्हणाले, 25 टक्के महिला माझ्या कॅबिनेटमध्‍ये आहे. त्यात परराष्‍ट्र मंत्री पण एक महिलाच आहे. गुजरातचे मुख्‍यमंत्री असताना मुलींच्या शिक्षणावर 78 कोटींचा खर्च केल्याचा त्यांनी सांगितले.

पुढील स्लाइड्सवर पाहा मोदी यांच्या दौ-याचे छायाचित्रे....