(फाइल फोटो: न्यूयॉर्कमधील मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये भारतीय नागरिकांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी)
न्यूयॉर्क- तब्बल 84 वर्षांनंतर 'टाइम' मॅग्झिनचा 'पर्सन ऑफ द ईयर'चा बहुमान दुसर्यांदा भारतीय व्यक्तीला मिळण्याची शक्यता होती. मात्र, सोमवारी संपूर्ण भारतीयांचे स्वप्न भंगले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 'पर्सन ऑफ द ईयर'मधून बाहेर झाले.
'रीडर्स पोल'ने नरेंद्र मोदींना 'पर्सन ऑफ द ईयर' बनवले, मात्र, 'टाइम'च्या संपादकीय मंडळाने जाहीर केलेल्या टॉप 8 मध्ये नरेंद्र मोदी स्थान मिळवता आले नाही. टॉप 8 मधून एकाची 'पर्सन ऑफ द ईयर' म्हणून निवड केली जाणार आहे. 'पर्सन ऑफ द ईयर'ची घोषणा बुधवारी होणार आहे.
टॉप 8 मध्ये काट्याची लढत...
- जॅक मा, अलिबाबाचे संचालक
- इबोला नर्सिंग स्टाफ
- व्लादिमीर पुतिन, रशियाचे राष्ट्राध्यक्ष
- टिम कुक, अॅपलचे सीईओ
- फर्ग्युसनचे आंदोलक
- टेलर स्विफ्ट, गायिका
- रॉजर गुडेल, एनएफएल कमिश्नर
- मसूद बरजानी, कुर्दिश नेता
महात्मा गांधींना 1930 मध्ये मिळाला होता बहुमान...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना 1930 साली 'टाईम'चा 'पर्सन ऑफ द ईयर'चा बहुमान मिळाला होता. हा बहुमान प्राप्त करणारे पहिले भारतीय व्यक्ती ठरले होते.
नरेंद्र मोदींना मिळाली 8.10 लाख मते...
'टाइम'च्या ऑनलाइन रीडर्स पोल शनिवारी मध्यरात्री समाप्त झाला. यात नरेंद्र मोदी विजेता ठरले. एकूण 50 लाख मतांपैकी नरेंद्र मोदी यांना 8.10 लाख मते मिळाली. अमेरिकेतून 18.50 लाख लोकांनी मतदान केले. तर भारतातून 8.50 लाख लोकांनी
आपले मत नोंदवले. पोलमध्ये हॉंगकॉंगचा विद्यार्थी जोशुआ वोंग आणि नोबेल विजेता मलाला यूसुफजाई देखील टॉप-10 मध्ये होते. मात्र, संपादकीय मंडळाच्या फेरीत दोघे बाहेर झाले.
अंतिम निर्णय संपादकांचाच...
'पर्सन ऑफ द ईयर'च्या निवडीत अंतिम निर्णय 'टाइम' मॅग्झिनचे संपादक घेत असतात. वर्षभरात चांगल्या-वाईट कारणामुळे चर्चेत राहिलेल्या व्यक्तीला 'पर्सन ऑफ द ईयर'चा पुरस्कार दिला जातो. 'पर्सन ऑफ द ईयर'साठी 1998 पासून ऑनलाइन पोलिंग सुरु झाले होते. नरेंद्र मोदींना टॉप 8 मध्ये स्थान का मिळवू शकले नाही, याविषयी माहिती मिळू शकली नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, टॉप 8 मधील व्यक्तींविषयी...