काठमांडू - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘नेपाळमधील अंधार भारत दूर करेल’, असा आपुलकीचा आधार देत 10 वर्षांनी हाच शेजारी देश भारत प्रकाशमान करेल, असा विश्वास व्यक्त केला. नेपाळच्या संसदेत केलेल्या भाषणात त्यांनी या देशावर असलेला चीनचा प्रभाव कमी करण्याचे या प्रकारे स्पष्ट संकेत दिले.
मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौर्यावर काठमांडूत पोहोचले. जर्मनीनंतर नेपाळच्या संसदेत भाषण करणारे दुसरे परदेशी पंतप्रधान ठरले. उत्स्फूर्तपणे केलेल्या भाषणात मोदींनी माओवादी विचारसरणीच्या नेपाळी राजकीय पक्षांचीही स्तुती केली. हे पक्ष भारतविरोधी मानले जातात. नेपाळमधील काही पक्ष बुलेट सोडून बॅलेटच्या, शस्त्र सोडून शास्त्राच्या आणि युद्ध सोडून बुद्धांच्या मार्गावर आल्याबद्दल मोदींनी समाधान व्यक्त केले. मोदी सोमवारी पशुपतिनाथ मंदिरात दर्शन घेणार आहेत.
मोदींच्या घोषणा आणि अर्थ...
1 ‘भारत दहा वर्षांनंतर नेपाळकडूनच वीज खरेदी करायला सुरुवात करेल.’
महत्त्व : नेपाळ मंत्रिमंडळात वीज व्यापार करार व कर्नाली वीज प्रकल्प मंजुरीचे विधेयक रखडले आहे. सुखेतमध्ये कर्नाली नदीवर 900 मेगावॅटचा प्रकल्प प्रस्तावित असून पंचेश्वर प्रकल्पाचे काम वर्षभरात सुरू होईल.
2 मोदींनी नेपाळला 6 हजार 300 कोटी रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे.
महत्त्व : हा निधी वीजनिर्मिती प्रकल्प, पायाभूत सुविधांवरच खर्च करण्याचे भारताने नेपाळकडून मान्य करून घेतले आहे.
3 मोदी म्हणाले, ‘इंधन तेल आता नेपाळमध्ये ट्रकऐवजी पाइपलाइनने यावे.’
महत्त्व : आपल्या सीमेतून नेपाळमध्ये 80 किमी पाइपलाइन टाकण्यास भारत उत्सुक. यावर 300 कोटी खर्च अपेक्षित. लाभ इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला.
मोदींच्या भाषणातील उर्वरीत भाग पुढील स्लाइडवर