आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi To Pray At Pashupatinath Temple Kathmadu; News In Marathi

मोदींच्या गळ्यात रुद्राक्ष माळ, कपाळावर टीळा; दान केले 2500 किलो चंदन!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू/नवी दिल्‍ली- दोन दिवसीय नेपाळ दौर्‍यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (सोमवार) काठमांडू येथील जगप्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिरात पोहोचले. श्रावणी सोमवारचे औचित्य साधून नरेंद्र मोदी शिव शंकराचा जलाभिषेक केला. यावेळी 108 प्रशिक्षणार्थी पुरोहितांनी मंत्रोपचार केले. जवळपास 50 मिनिटे मोदी शिवशंकराच्या गाभार्‍यात होती. मोदी मंदिराबाहेर आले तेव्हा त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ होती तर कपाळावर चंदना टीळा होता.

विशेष नरेंद्र मोदी यांनी पशुपतीनाथ मंदिर प्रशासनाला 2,500 किलो पांढरे भारतीय चंदनाचे लाकूड भेट दिली आहे. शिवलिंगाला लेप लावण्यासाठी दररोज अर्धा किलो पांढरे चंदनाचे लागूड लागते. मोदींनी अडीच हजार किलो पांढरे भारतीय चंदन दान केल्याने मंदिर प्रशासन समितीला दिलासा मिळाला आहे. यापूर्वीही भारत सरकारने पशुपतीनाथ मंदिराला 500 किलो चंदनाचे लाकूड भेट दिले होते.

मोदी दोन दिवसीय नेपाळ दौर्‍यावर आहेत. आज दौर्‍याचा दुसरा दिवस आहे. मोदी नेपाळचे राष्ट्राध्यक्ष रामबरन यादव यांची भेट घेणार आहेत. मोदी मायदेशी परतण्यापूर्वी काही विविध राजकीय पक्ष प्रमुखांचीही भेट घेणार आहेत.

दरम्यान, नरेंद्र मोदी रविवारी (3 ऑगस्ट) सकाळी अकरा वाजता काठमांडूला पोहोचले. 'हर हर मोदी, घर घर मोदी' अशी घोषणा करत नेपाळी जनतेने मोदींचे स्वागत केले होते. नेपाळी जनतेचा आनंद पाऊन मोदी कमालीचे भारावले आहेत. त्यामुळे मोदींनी आपला प्रोटोकॉल तोडून एका बाजारात थांबून जनतेशी काही वेळ चर्चा केली. त्यांच्यांशी हस्तांदोलनही केले.

मोदींसाठी नेपाळच्या पंतप्रधानांही तोडला प्रोटोकॉल...
काठमांडू येथील त्रिभुवन एअरपोर्टवर नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनी स्वत: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. कोईराला यांनी यावेळी कुठलाही प्रोटोकॉल पाळला नाही. मोदींना 21 तोफांनी सलामी देण्यात आली. तसेच कोईराला मोदींना संसदेत घेऊन गेले.
दरम्यान, मोदी यांनी रविवारी (3 ऑगस्ट) नेपाळमधील संसदेत संबोधित केले होते. नेपाळी भाषेत भाषणाची सुरुवात करून हिंदी भाषेत नेपाळी नेत्यांना जिंकूण घेतले होते.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, नरेंद्र मोदींच्या नेपाळ दौर्‍याची छायाचित्रे...

(फोटो: काठमांडू येथील सुप्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिरात पोहोचले नरेंद्र मोदी.)