आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi To Unveil Mahatma Gandhi Statue In Brisbane

महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण, \'मुख्यमंत्री नव्हतो तेव्हापासून गांधी विचारांवर बोलतो\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेन मधील मोदींचे इंग्रजीतील भाषण ऐकण्यासाठी वरील लिंकला क्लिक करा.

ब्रिस्बेन
- मी पंतप्रधानच काय, गुजरातचा मुख्यमंत्री नव्हतो तेव्हापासून महात्मा गांधींच्या विचारांवर बोलत आलो आहे. असे, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ब्रिस्बेन येथील भारतीय वंशांच्या नागरिकांनी तयार केलेल्या गांधी स्मारकाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते रविवारी अनावरण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. 2001 मध्ये मी येथे आलो असताना अनौपचारिक गप्पांमध्ये महात्मा गांधीचे स्मारक असले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. ती तुम्ही एवढ्या गांभीर्याने घेत हे स्मारक उभारले, असे म्हणत मोदींनी भारतीय वंशांच्या नागरिकांचे अभिनंदन केले.

जी-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मोदी ऑस्ट्रेलिया दौर्यावर आहेत. रविवारी त्यांनी येथे इंग्रजीतून भाषण केले. त्यांच्या भाषाणातून आत्मविश्वास झळकत होता. मोदींनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शिक्षण, पर्यटन, तंत्रज्ञान यासह अनेक क्षेत्रांमध्ये देवाण-घेवाण वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली. मोदी म्हणाले, 'ब्रिस्बेन हे तंत्रज्ञानासाठी ओळखले जाते. भारतामध्ये यासाठी हैदराबादचे नाव घेतले जाते. त्याला आता सायबराबाद असेही म्हटले जाते.' पंतप्रधान म्हणाले, दोन्ही शहरांमधील साम्यस्थळांमुळे यांच्यातील संबंध अधिक वृद्धींगत करण्याची गरज आहे आणि ते होऊ शकतात.

अनौपचारिक गप्पात व्यक्त केली होती गांधी स्मारकाची अपेक्षा
ब्रिस्बेन नागरिकांच्या स्वागत कार्यक्रमाआधी पंतप्रधान मोदींनी ब्रिस्बेनमधील रोमा स्ट्रिट येथील महात्मा गांधींच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी मोदी म्हणाले, 'काही लोक म्हणत आहेत की मोदी पंतप्रधान झाल्यानंतर वारंवार गांधींचे नाव घेत आहेत. मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री देखील नव्हतो तेव्हा मी ब्रिस्बेनच्या लोकांसमोर गांधींचा गौरव केला होता.' मोदी म्हणाले, की 2001 मध्ये जेव्हा मी येथे आलो होतो, तेव्हा मी येथील एका कुटुंबाला म्हणालो होतो की, येथे गांधींचे एक स्मारक असले पाहिजे. मी अनौपचारिक गप्पांमध्ये व्यक्त केलेली अपेक्षा आज पूर्ण झाली आहे, यावर माझा विश्वास बसत नाही.

ऑस्ट्रेलियात उत्साह
मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात भारतीय वंशांच्या लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. भारतात ज्या प्रमाणे मोदींचे स्वागत केले जाते, तसेच ऑस्ट्रेलियात मोदींचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर लोक 'मोदी-मोदी', 'भारत माता की जय'च्या घोषणा देत आहेत. त्यांच्यासोबत हात मिळवण्यासाठी लोकांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. या कार्यक्रमाला क्विन्सलँडचे गव्हर्नर आणि महापौर उपस्थित होते.
गांधींचा पुर्णाकृती पुतळा
मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा पुतळा दिल्लीतील एका मुर्तिकाराने तयार केला आहे. या पुतळ्याची उंची 2.5 मीटर असून कांस्य आणि आफ्रिकन ग्रेनाइटचा यात वापर करण्यात आला आहे. या पुतळ्यासाठी ऑस्ट्रेलियातील भारतीयांनी एकत्र येऊन फंड उभा केला. या स्मारकाचे मुळचे गुजरातचे असलेले आर्किटेक्ट हेमंत नायक देखील उपस्थित होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, महात्मा गांधींच्या पुतळा अनावरणाची आणखी छायाचित्र आणि मोदींचे भाषण.