आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका दौराः तीसरा दिवस, पाहा, मोदींच्या या दौर्‍यातील क्रमवार PHOTO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: हवाई येथील काँग्रेसच्या सदस्य तुलसी गबार्डे यांनी नरेंद्र मोदी यांचे जिंजर फुलांचा हार घालून स्वागत केले.)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबरला त्यांच्या पाच दिवसीय अमेरिकेच्या दौर्‍यावर गेले आहेत. रविवारी त्यांनी न्यूयॉर्कच्या प्रसिध्द अशा मेडिसन स्क्वेअरवर भारतीयांना संबोधित करून भाषण केले. अमेरिकेत मोदी भारतीयांच्या सर्वात मोठ्या मंचावर जवळपास 75 मिनिटांपर्यंत बोलले. तसेच निवडणूकीदरम्यान समर्थन दिल्याबद्दल त्यांनी भारतीयांचे आभारही मानले. तसेच भारतीय प्रवाशांसाठी अनेक योजनाही जाहिर केल्या. यामुळे भारतीयांना अमेरिकेला येण्या-जाण्यास अधिक सुविधा होईल.
मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये मोदींच्याच नावाची चर्चा होती. लोकांमध्ये मोदींना ऐकण्यास खुपच उत्सूकता होती. त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला आयोजन स्थळावर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लोकनृत्याची झलक पाहायला मिळाली, तसेच बॉलिवूडच्या अनेक गाण्यांवरही नृत्य करण्यात आले. मोदींच्या अमेरिका दौर्‍याचा आज तिसरा दिवस होता. या तिसर्‍या दिवसापर्यंतचे फोटो Divyamarathi.com ने खास तुमच्यासाठी आणले आहेत.

पुढील स्लाईडवर पाहा, या दौर्‍या दरम्यानचे फोटो...