आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi\'s Speech At Madison Square Garden

तीन चुका: मोदींनी मेडिसन स्क्वेअरवरील भाषणात महात्मा गांधींचे घेतले चुकीचे नाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या अमेरिका दौर्‍यावर आहेत. आज ते वॉशिंग्टनला जाणार आहेत आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतील. त्याआधी रविवारी त्यांनी न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध मेडिसन स्क्वेअर गार्डनवर भारतीय वंशाच्या लोकांना संबोधीत केले. मोदी यांच्या येथील भाषणावर सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे. मोदींनी भाषणात नवीन काहीच सांगितले नाही, जुन्याच गोष्टी पुन्हा एकदा कथन केल्या, त्यातही महात्मा गांधींच्या नावाचा चुकीचा उल्लेख केला. या कारणांमुळे मोदींच्या भाषणावर टीका होत आहे.
१ - मोहनदास करमचंद गांधींचा उल्लेख केला मोहन लाल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुर्ण नावाचा मोहनदास करमचंद गांधी असा उल्लेख करण्याऐवजी मोहन लाल गांधी असा उल्लेख केला. मोदींनी महात्मा गांधीचे नाव चुकविल्याने सोशल मीडियावर युजर्सनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर, मोदींच्या बचावासाठी भाजपच्या एक महिला कार्यकर्त्या पुढे सरसावल्या आणि त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या बचावात लिहिले, महात्मा गांधींच्या काही कागदपत्रांवर त्यांचे नाव मोहनलाल गांधी असे लिहिलेले आहे.
(या चुकांमुळे संयुक्त राष्ट्रांत नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणावर होत आहे टीका)

2 - मोदींचा 'नर्स एक्स्पर्ट' करण्याचा अजेंडाही फैलावर
मोदींनी त्यांच्या भाषणात, '2020 मध्ये जगाला मनुष्यबळाची मोठी गरज भासणार आहे, ती भारत पूर्ण करेल. जगाला गणित, विज्ञान विषयांच्या शिक्षकांची गरज आहे. नर्सची मोठी मागणी आहे. भारत एक्स्पर्ट शिक्षक आणि नर्सचा जगाला पूरवठा करेल.' असे म्हणाले. त्यांच्या या वक्त्यव्याचा त्यांचे प्रशंसक आणि ज्येष्ठ पत्रकार मधु किश्वर यांनी समाचार घेतला आहे. किश्वर यांनी ट्विट केले आहे. 'नरेंद्र मोदी यांचे नर्स आणि शिक्षक एक्स्पर्ट करण्याचे वक्तव्य अपरिपक्व आहे. आमच्याकडे आमची गरज पूर्ण होईल एवढेही शिक्षक आणि नर्स नाहीत.'
3 - भाषणात जुनीच आश्वासने
- मोदींनी मेडिसन स्क्वेअरवरील भाषणात जुनेच किस्से आणि आश्वासने पुन्हा नव्याने दिली. मोदी म्हणाले, 'आमचे पूर्वच 'सापां'सोबत खेळत होते, आता आम्ही 'माऊस'सोबत खेळतो. आमचे युवक माऊस हलवून जगाला फिरवतात.' लोकसभा निवडणुकीच्या भाषणातही ते हेच किस्से मतदारांना ऐकवत होते.
- डेमोक्रसी, डेमोग्राफिक डिव्हिडंड आणि डिमांड : मोदी म्हणाले, 'आमच्याकडे डेमोक्रसी, डेमोग्राफिक डिव्हिडंड आणि डिमांड या तिन गोष्टी आहेत, ज्या जगातील कोणाकडेही नाही. हेच विचार त्यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीतील 'मेक इन इंडिया' अभियानाच्या कार्यक्रमात व्यक्त केले होते.'

- मोदींनी मेडिसन स्क्वेअरवर देखील चहा विक्रीचा उल्लेख केला. लोकसभा निवडणूक प्रचारात त्यांनी मी चहा विकत इथपर्यंत आल्याचा वारंवार उल्लेख केला होता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मोदींच्या भाषणावर सोशल साइट्सवर कशी होत आहे टीका