आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PML N Candidate Mamnoon Hussain Elected As 12th President Of Pakistan

ममनून हुसेन यांची पाकिस्‍तानचे राष्‍ट्राध्‍यक्ष म्‍हणून निवड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानचे बारावे राष्‍ट्राध्यक्ष म्हणून सत्ताधारी 'पीएमएल-एन' पक्षाचे उमेदवार ममनून हुसेन यांची आज (मंगळवार) निवड झाली आहे. पाकिस्तानमध्ये राष्‍ट्राध्‍यक्षपदासाठी आज निवडणूक झाली.

इमरान खान यांच्या 'पाकिस्तान तेहरिके इन्साफ' पक्षाचे उमेदवार वजिहुद्दीन अहमद यांच्याशी हुसेन यांची थेट लढत होती. राष्‍ट्राध्‍यक्षपदाची निवडणूक 6 ऑगस्‍टला होणार होती. परंतु, रमझानमुळे निवडणूक लवकर घेण्‍याचे आदेश न्‍यायालयाने दिले होते. त्‍यानुसार आज मतदान झाले. विद्यामान राष्‍ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्या 'पीपीपी'ने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. नव्‍या राष्‍ट्रपतींची निवड झाल्‍यानंतर झरदारी देश सोडून जाण्‍याच्‍या तयारीत असल्‍याचेही वृत्त आले होते. त्‍यांच्‍याविरुद्ध भ्रष्‍टाचाराची प्रकरणे बाहेर काढण्‍याची भीती असल्‍यामुळे ते पलायन करणार असल्‍याचे बोलले जात आहे.