आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉरंटविना नाही होणार सेलफोनची तपासणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने वॉरंटविना सेलफोनची तपासणी न करण्याबाबतचा निर्णय देऊन सायबर अधिकारांसंदर्भातील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स म्हणाले की, मुलांचे अपहरण, कुठे टाइम बाँब ठेवलेला असण्याची अपवादात्मक स्थिती वगळता विनावॉरंट सेलफोनची तपासणी करता येणार नाही.

त्यांनी निर्णयात म्हटले आहे की, प्रायव्हसीसंदर्भात पर्स व सेलफोन यांच्यात तेवढाच फरक आहे, जेवढा घोडेस्वरी व चंद्रावरील हवाई उड्डाणामध्ये आहे. मोबाईल फोनच्या रूपात खिशात ठेवलेल्या मिनी कॉम्प्युटरमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनातील माहिती असते. नवीन तंत्रज्ञानाने खासगी जीवनाला चालते-फिरते बनविले आहे. याचा अर्थ असा नाही की, याची सुरक्षा व्हायला नको. सुप्रीम कोर्टाच्या समोर प्रश्न उपस्थित केला गेला होता की, पोलिस अधिकारी अटकेनंतर वॉरंटविना सेलफोनची तापसणी करू शकतात, ज्या प्रमाणे डायरी व पर्सची केली जाते.

सुप्रीम कोर्टाच्या नियर्णयाला स्तब्धकारी व क्रांतिकारी मानले जात आहे. वरिष्ठ वकील टॉम गोल्डस्टीन यांनी म्हटले, मुख्य न्यायमूर्तींनी घटनेला अनुसरून डिजिटल प्रायव्हसीला मान्यता दिली आहे. अमेरिकेतील निम्न स्तरावरील न्यायालये याबाबत विचार करत आहेत की, नॅशनल सिक्युरिटी एजन्सीने मोठ्या प्रमाणावर डाटा संकलित करून प्रायव्हीसेच उल्लंघन केले आहे. जे लोक मानतात की, एनएसएनने लोकांच्या खासगी जीवनात हस्तक्षेप केला आहे, त्यांनी या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले आहे.