आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिओने पाकिस्तानची उडाली झोप; मोठी मोहीम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पोलिओ निर्मूलनात अपयश आल्याचा कलंक पुसण्यासाठी पाकिस्तानने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. या वर्षी देशात मोठ्या संख्येने पोलिओ रुग्ण आढळून आल्याने देशाची जगभरात नाचक्की झाली.

चालू वर्षी पाकिस्तानात निर्मूलनाचे सत्य चव्हाट्यावर आले होते. प्रशासनाकडून केले जाणारे प्रयत्न आणि वास्तव याचे दाहक पुन्हा समोर आले. दोनशेहून अधिक रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे जगभरातील पोलिओ उच्चाटनाच्या मोहिमेला धक्का बसला. त्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची छी-थू झाली नसती तरच नवल. त्यामुळे यातून कसेबसे सावरत कलंक पुसण्याची आणखी एक जोरदार माेहीम हाती घेण्याचा संकल्प करण्यात आला आहे. मोहिमेत लाखो मुलांचे नव्याने लसीकरण केले जाणार आहे.

मेपासून बंदी
जागतिक आरोग्य संघटनेने पाकिस्तानमध्ये पर्यटनासाठी बंदी आणल्याने देशाच्या अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे देशावर नामुष्की ओढवली.

३० लाख मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट.
२३५ रुग्ण चालू वर्षी आढळले.

तीन देशांत अजूनही समस्या
पाकिस्तानसह शेजारच्या अफगाणिस्तान आणि नायजेरियामध्येदेखील पोलिओची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे जगभरातील एकूण मोहिमेलाच खीळ बसण्याचे काम या तीन देशांमुळे झाले आहे.

सहा महिन्यांत उच्चाटन करा -शरीफ
पाकिस्तानातून पोलिओचे पूर्णपणे उच्चाटन करण्यात यावे, असे आदेश पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी बजावले आहेत. भावी पिढ्यांसाठी हा गुन्हा मानला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. बुधवारी या संदर्भातील उच्चस्तरीय बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. बैठकीला मुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकारी, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधीही उपस्थित होते.