आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल है कि मानता नही, कुठे राष्‍ट्रपती तर कुठे पतंप्रधान प्रेमाच्‍या अडीच अक्षरांनी घायाळ...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रान्सचे राष्‍ट्रपती फ्रांसिस ओलांद आणि अभिनेत्री जुलिया गाएट यांच्‍या प्रेम प्रकरणाची चर्चा सध्‍या जगभर होत आहे. या प्रेम प्रकरणामुळे जगभरामध्‍ये राजकीय नेतृत्त्‍वाची प्रेम प्रकरणे चर्चेचा विषय ठरली आहेत. ओलांद आणि अभिनेत्री जुलिया गाएट यांच्‍या प्रेम प्रकरणानिमित्त जगातील काही राष्‍ट्राध्‍यक्षांच्‍या प्रेमाच्‍या गोष्‍टी आम्‍ही आपल्‍या सांगणार आहोत.
राष्‍ट्राध्‍यक्ष आणि त्‍यांचे वादग्रस्‍त प्रेम प्रकरण -
फ्रान्स कायद्यानुसार एखाद्याच्‍या खाजगी आयुष्‍यावर चर्चा करणे हा गुन्‍हा ठरतो. असे असताना 'क्लोजर' मासिकाने फ्रान्सचे राष्‍ट्राध्‍यक्ष फ्रांसिस ओलांद यांच्‍या प्रेम प्रकरणावर प्रकाश टाकला आहे. राष्‍ट्राध्‍यक्ष यांच्‍या खाजगी आयुष्‍यावर चर्चा केल्‍यामुळे या मासिकावर कारवाई होऊ शकली असती. परंतु या घटनेकडे ओलांद यांनी दुर्लक्ष केले. ओलांद यांचे अशा प्रकारचे वागणे त्‍यांच्‍या पदाला शोभणारे नाही अशा प्रतिक्रिया फ्रान्सच्‍या जनतेने दिल्‍या आहेत. ओलांद यांनी मात्र या प्रकरणासंदर्भात मौन पाळले आहे.
चार मुले असणारे 60 वर्षीय ओलांद व 41 वर्षीय अभिनेत्री जूलिया गाएट यांच्‍या प्रेमाची चर्चा सध्‍या फ्रान्समध्‍ये होत आहे. ओलांद जूलियाच्‍या प्रेमात वेडे झाले असून अर्ध्‍या रात्री भेटण्‍यासाठी स्‍कूटरवर तीच्‍या घरी जातात. ओलांद यांच्‍या प्रेम प्रकरणामुळे त्‍यांची जोडीदार ट्रिअरवेलर आजारी पडली आहे.
ट्रिअरवेलर या व्‍यवसायाने पत्रकार असून त्‍या ओलांद यांच्‍यासोबत 'लिव इन रिलेशन' मध्‍ये राहत होत्‍या. ओलांद यांनी ट्रिअरवेलर यांच्यासाठी जुन्या प्रेयशी व राजकीय सहकारी सेगोलेने सोबतचे संबंध तोडले होते. सेगोलीनेपासून ओलांद यांना चार मुले आहेत.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा व जाणून घ्‍या राजकीय नेत्‍यांची प्रेम प्रकरणे ...