आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकमध्ये पोलिओवर राजकारण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानातील कराची शहरातील सर्वात घाणेरडी झोपडपट्टी गडापमध्ये नाल्याजवळ पडलेल्या कचर्‍यातून मुलं बाटल्यांची झाकणं गोळा करतात. कपाप्रमाणे झाकणाचा वापर करत ते घाणेरड्या पाण्याचा आनंद लुटतात. ते कदाचित खर्‍याखुर्‍या चहा पार्टीची कल्पना करत असतील. त्या पाण्यात मिसळलेल्या पोलिओच्या विषाणूंविषयी त्यांना कोणतीही माहिती नाही. मानवी मलामुळे हा विषाणू पाण्यात मिसळतो.

एक झाकण पाणी त्यांच्या तोंडातील पटलात विषाणू पोहोचवू शकते, याचीही त्यांना कल्पना नाही. विषाणू गळ्यातील पेशींसोबत मध्यवर्ती चेतासंस्थेत पोहोचते. त्यांची संख्या झपाट्याने वाढते. स्नायूंना नियंत्रित करणार्‍या मोटर न्यूरॉन्सला नष्ट करते. यामुळे पायांना अर्धांगवाताचा झटका येतो. अनेकदा हातही निकामी होतात. कधी कधी तर श्वासाला नियंत्रित करणार्‍या स्नायूंनाही विषाणू प्रभावित करतात.

परंतु कराचीच्या उत्तरेकडील सांगो वसाहतीतील रहिवासी सलमा खान अशा बाबींविषयी खूप गांभीर्याने विचार करतात. काही महिन्यांपूर्वीपर्यंत त्यांचा मुलगा बिलाल त्याची बहीण उरूजच्या मागे घरभर धावायचा. एके दिवशी त्याला ताप आला. काही दिवसांनंतर त्याला चालताच येईना. सलमा सांगतात, माझी सारी स्वप्ने भंगली. तो आयुष्यभरासाठी अधू झाला आहे. बिलालच्या पायांना अधू करणारा विषाणू गडापमधूून आल्याची शक्यता आहे. आनुवंशिक रूपरेषेवरून (जेनेटिक प्रोफायलिंग) स्पष्ट झाले की, पाकिस्तानच्या चार प्रांतात आणि अफगाणिस्तान, चीनमध्ये आढळून आलेला विषाणू गडापच्या घाणेरड्या वसाहतीतील विषाणूच्या वंशातील आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे पोलिओतज्ज्ञ डॉ. सलाह तुमसा सांगतात, गडाप शहर पोलिओचा कारखाना आहे. उघड्या नाल्यासह घाणेरड्या जागांमध्ये विषाणूंचा प्रसार होतो.

दुसरीकडे मागील काही वर्षांत पोलिओविरोधी अभियानाने गती पकडली आहे. पोलिओ विषाणूच्या विरोधातील संघर्षात प्रामुख्याने साल्क आणि साबिन वॅक्सीनचा वापर केला जातो. 1988 पर्यंत 125 देशांत पोलिओचा प्रकोप होता. दरवर्षी तीन लाख 50 हजारांवर लोकांना पोलिओमुळे अपंगत्व येतं किंवा त्यांचा मृत्यू होत असे. यात मुलांची संख्या सर्वाधिक असे. सरकारी आणि गैर सरकारी संस्थांच्या सखोल मोहिमेमुळे विषाणू केवळ तीन देश पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नायजेरियापुरताच मर्यादित झाला आहे. 2012 मध्ये जगभरात पोलिओचे 215 रुग्ण आढळून आले. मानवी इतिहासात यापूर्वी केवळ देवी रोग नष्ट झाला आहे. पोलिओ असा दुसरा रोग ठरू शकतो. अट एवढीच की, त्याच्या विरोधात सुरू असलेली लढाई युद्धाच्या फेर्‍यात अडकू नये. पाकिस्तानात पोलिओ निर्मूलन अभियानादरम्यान डिसेंबरमध्ये पाक तालिबानशी निगडित दुचाकीस्वारांनी 6 महिलांसह 9 कार्यकर्त्यांची गोळ्या झाडत हत्या केली होती. 1 जानेवारीला 6 महिला आणि एका पुरुषाला अशाच प्रकारे मारण्यात आले. सर्वच वैद्यकीय कार्यकता होते. तालिबानने जूनमध्ये उत्तर वझिरीस्तानात मुलांना पोलिओ लसीकरण थांबवण्याची धमकी दिली होती. यानंतर हा रक्तपात झाला.

अपप्रचार
पोलिओ लसीकरणाविरोधात मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जात आहे. अमेरिका आणि सहकारी देश लसीकरणाच्या नावाखाली हेरगिरी करतात, अशा अफवाही पसरवल्या गेल्या. 2011 मध्ये अमेरिकी सैनिकांनी ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यानंतर या अपप्रचाराला अधिक बळकटी मिळाली. कारण एका पाकिस्तानी डॉक्टरने हिपॅटायटिस लसीकरण कर्मचार्‍याच्या वेशात नातेवाइकांच्या रक्ताचे नमुने घेत ओसामा अबोटाबाद परिसरातच लपल्याची माहिती दिली होती. पोलिओ लसीकरणात एचआयव्ही असल्याचा अपप्रचार केला गेला. डुक्कर किंवा माकडाच्या लघवीतून हे तयार केले जाते. मुलांच्या प्रजननक्षमतेवर याचा परिणाम होत असल्याचे सांगितले गेले. लसीकरणाविरोधात पसरवण्यात आलेल्या खोट्या बातम्यांचा प्रभाव पडला. उत्तर पाकिस्तानातील पेशावरजवळील मोहिब बांदात दुकान चालवणार्‍या सैफुल इस्लामच्या मते, आम्ही निरक्षर आहोत. कुणीही काही सांगितल्यास त्यावर विश्वास टाकतो. जुलैमध्ये पोलिओ कर्मचारी आले, तर त्यांनी आपल्या सहा महिन्यांच्या मुलीला लसीकरण करू दिले नाही. आता मुलीला पोलिओ झालाय.
नष्ट होण्याच्या मार्गावर
काहीही असो, पोलिओ लसीकरणाविरोधात सक्रिय शक्तींनी त्याचे रक्षण करणार्‍यांना पिछाडीवर टाकले आहे. 1979 मध्ये अमेरिकेतून पोलिओ नष्ट झाल्यानंतर रोटरी इंटरनॅशनलने जगभरातून पोलिओच्या उच्चाटनासाठी मोहीम हाती घेतली. युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकी आजार नियंत्रण केंद्रांनी जोर लावला. 2007 मध्ये बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनही याला जोडले गेले. फाउंडेशनने आतापर्यंत 55 अब्ज रुपये खर्च केलेत. पोलिओचा विषाणू वेगाने पसरतो. 2003 मध्ये हा आजार नष्ट होण्याच्या मार्गावर होता. यादरम्यान नायजेरियात धर्मगुरूंनी नपुंसकता आणि एचआयव्ही पसरण्याच्या अफवेमुळे लसीकरण थांबवले. दोन वर्षांनंतर 16 देशांमध्ये पोलिओ आढळून आला. विषाणू नायजेरियन वंशाचा होता. रोटरीचा अंदाज आहे, आगामी काही वर्षांपर्यंत विषाणूच्या खात्म्यावर वर्षाला 55 अब्ज रुपये खर्च केल्याने 20 वर्षांत जवळपास 2700 अब्ज रुपये वाचतील. नष्ट न झाल्यास ही रक्कम संक्रमण झालेल्या मुलांच्या उपचार, लसीकरण योजनेवर खर्च करावी लागेल. अनंत संकटांनंतरही पोलिओ लवकरच नष्ट होण्याच्या आशा वाढल्या आहेत. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नायजेरियाच्या नेत्यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केलाय. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष जॉनाथनने 2015 पर्यंत देशातून पोलिओचे उच्चाटन करण्याचे वचन दिले आहे. अफगाणिस्तानात स्वत: हमीद करझाई यांनी मुलांना पोलिओचा डोस पाजला आहे. पाकिस्तानात सरकारने वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना केल्यात. मुलांच्या देखरेखीसाठी कुराणांतील आयतांचा दाखला दिला जातो. रोटरी, जागतिक आरोग्य संघटनेला आशा आहे की, 2014 पर्यंत पोलिओविरोधात विजय निश्चित मिळेल.

अडीच अब्ज मुलांना दिली लस
पोलिओनाशक साबिन लसीची एक समस्या आहे. लसीतील जिवंत विषाणू लस घेणार्‍यांना आजारीही पाडू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेचे पोलिओ अभियानाचे प्रमुख डॉ. ब्रूस एलवॉर्ड यांच्या मते, अशी प्रकरणे दुर्मिळ आहेत. 2000 पासून अडीच अब्ज मुलांना लस देण्यात आली आहे. यापैकी केवळ 610 मुलांना पोलिओ झालाय. खबरदारी म्हणून तीन प्रभावित देशांमध्ये साबिनसोबतच साल्कचीही लस दिली जातेय.


अर्ध्या शतकाची लढाई
1955 मध्ये संक्रमण रोगांचे तज्ज्ञ थॉमस फ्रान्सिस ज्युनिअरने मिशीगन विद्यापीठातील रॅकहॅम ऑडीटोरियममध्ये घोषणा केली होती, साल्क पोलिओ लस उपयुक्त आहे. ही सुरक्षित, प्रभावी आणि मारक आहे. थॉमसच्या नेतृत्वाखाली जोनस साल्कच्या लसीची प्रत्यक्ष तपासणीही करण्यात आली होती. 1952 मध्ये जवळपास 58,000 अमेरिकन नागरिकांना पोलिओ होता. 1961 पर्यंत ही संख्या 1312 वर आली. याचवर्षात अलबर्ट साबिनच्या तोंडाद्वारे दिल्या जाणार्‍या लसीचा अधिकाधिक वापर सुरू झाला.

साल्क, साबिन लसीतील फरक
साल्क आणि साबिनच्या लसीत मोठा फरक आहे. साल्क लस इंजेक्शनद्वारे देतात. यात प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मेलेल्या विषाणूचा वापर केला जातो. तोंडाद्वारे दिल्या जाणार्‍या साबिन लस कमकुवत जिवंत विषाणूंपासून तयार केली जाते. आतड्यांतून ती रक्तात पसरते. शरीराच्या प्रतिकारक शक्तीला विषाणूंवर हल्ला करण्यास शिकवते.जेव्हा केव्हा विषाणू दिसतील, तेव्हा तिचा हल्ला होईल. साल्कमध्येही हीच प्रक्रिया आहे. साल्क लसीचा एक डोस 160 रुपयांना आहे, तर साबिन फॉर्म्युलेशनचे दोन थेंब पुरेसे आहेत. किंमत जवळपास 11 रुपये आहे.