रोम - वाढत्या प्रदूषणाचा फटका आता शेतीलाही बसत आहे. वायुप्रदूषणाच्या तडाख्यात अनेक पिकांची एकरी उत्पादकता निम्म्यावर आली आहे. ३० वर्षांतील आकडेवारीच्या अभ्यासाअंती हा निष्कर्ष काढला आहे. लोकसंख्येची घनता असलेल्या राज्यांत ४ वर्षांत गव्हाची उत्पादकता ५० टक्के घटली. धुरामुळे होणारे प्रदूषण यात प्रमुख आहे. कार्बनसह इतर दुषित रासायनिक घटकांचा फटका ९० टक्के, तर हानीत ग्लोबल वार्मिंगचा वाटा १० टक्के आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञ जेनिफर बर्नी यांनी हे संशोधन केले.
तर साखरेचा तुटवडा: उसाचे हेक्टरी उत्पादन वाढवण्यासाठी वेळीच पावले टाकली नाहीत तर मागणीपेक्षा जास्त साखर उत्पादन करणा-या भारतावर पाच वर्षांनी ती आयात करण्याची वेळ येईल.
उसाच्या हेक्टरी उत्पादनात घट
संशोधने होऊनही देशातील हेक्टरी ऊस उत्पादन घटले आहे. उद्योग संघटना असोचेमनुसार २००१-०२ मध्ये देशात उसाचे उत्पादन सरासरी ६७.३७ टन प्रतिहेक्टर होते, २०१२-१३ मध्ये ६६.४७ टनपर्यंत ते खाली आले. त्यातच महागाईमुळे उत्पादन खर्च वाढला, मात्र, मोबदला प्रमाणात मिळाला नाही. उसाचे क्षेत्र ४४.१ लाखावरून ५०.६ लाख हेक्टरपर्यंत वाढले.
देशात वाटा तंत्रज्ञानाचा
प्रदूषण नसणा-या ठिकाणी गव्हाचे उत्पादन किती होते याचे विश्लेषण यात करण्यात आले आहे. तसे पाहिले तर भारतात अन्नधान्य उत्पादन वाढते आहे. मात्र, त्यात आधुनिक तंत्राचा वाटा मोठा आहे.