आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडाळिंब हे आरोग्यासाठी उत्तम फळ आहे. तसेच त्यात औषधी गुणधर्मही आहेत. डाळिंबाचे ज्यूस नियमित सेवन केल्याने सेक्स पॉवर दुपटीने वाढते, असे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. डाळिंबाच्या ज्यूसमुळे सेक्स जागृत करणारा हॉमोन्स 'टेस्टास्टेरॉन' उत्तेजीत होऊन तो अधिक कार्यशील होत असतो. एवढेच नव्हेत व्यक्तिची स्मरणशक्ती वाढते व त्याचा मूडही चांगला राहतो.
जर एखादा पुरुष तसेच महिला दररोज एक ग्लास डाळिंबाचा रस नियमित घेत असेल तर त्यांना वायग्रा खाण्याची गरजही भासत नाही. डाळिंबाचे ज्यूस वायग्रापेक्षाही प्रणय पॉवर वाढविण्यासाठी मदतगार ठरते.
संशोधनासाठी 21 ते 64 वयोगटातील 58 स्त्री-पुरूषांना बोलावण्यात आले होते. त्यापैका काही लोकांना डाळिंबाचे ज्यूस देण्यात आले. तर काही वायग्रा देण्यात आले. अभ्यासात असे दिसून आले की, डाळिंबाचे ज्यूस घेतलेल्या पुरुषांसह स्त्रियांमध्येही प्रणय पॉवर वाढल्याचे जाणवले तर वायग्रा केवळ पुरूषांसाठी फायदेशीर असल्याचे समजले.
दरम्यान, यापूर्वी करण्यात आलेल्या संशोधनात असे स्पष्ट झाले आहे की, डाळिंब खाल्याने ह्दयाशी संबंधीत आजार बरे होतात. तसेच रक्ताभिसरण देखील व्यवस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.