आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोप बेनेडिक्ट यांची जाता जाता फान्समधील राज्यकर्त्यांवर टीका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - कॅथॉलिक धर्मगुरू बेनेडिक्ट सोळावे यांनी सोमवारी पोप पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयाची टर उडवणारे इटलीचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवाँ ओलांद आणि त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

थकल्यामुळे राजीनामा देणार असल्याचे पोप यांनी सोमवारी जाहीर केले. त्यानंतर ओलांद यांनी त्यावर खिल्ली उडवणारी प्रतिक्रिया दिली होती. ती अशी : पोप पदासाठी फ्रान्स उमेदवार उभा करणार नाही! ओलांद यांच्या वाचाळपणाचा सूर ओळखून माजी गृहमंत्री क्लाऊड जिंट यांनी त्याचा समाचार घेतला. ओलांद हे नास्तिक आहेत, हे सर्वांनाच ठाऊक आहेत. कॅथॉलिक चर्चच्या बाबतीत हे अधिक जाणवणारे आहे, परंतु पोप यांच्या निर्णयावर अशा प्रकारे विनोद करण्याची काही गरज नव्हती, असे जिंट यांनी सुनावले. ग्लॅमरस गर्लफ्रेंड व्हॅलेरी ट्रिरविलरसोबत राहणारे ओलांद कॅथॉलिक संस्कारात वाढले. कॅथॉलिक शाळेतच त्यांचे शिक्षणही झाले आहे. आपण कोणत्याही धर्माचे पालन करत नाहीत, परंतु सर्व धर्मांचा आदर करतो, असे वैयक्तिक तत्त्वज्ञान त्यांनी एकदा स्पष्ट केले होते. इटलीच्या महिला मंत्र्यांनीही पोपच्या निर्णयाची खिल्ली उडवली.

मंत्री महिलाही उपटसुंभ
राष्ट्राध्यक्षांनी आपली विनोदबुद्धी दाखवण्याच्या नादात वादंग निर्माण केलेले असतानाच इटलीच्या एका मंत्र्यानेही आपला उपटसुंभपणा दाखवून दिला. मिशेल डेल्यूने असे या महिला मंत्र्याचे नाव. पोप यांनी निर्णय घेण्यापूर्वी माझ्याशी सल्लामसलत करायला हवी होती, असे मत त्यांनी ट्विटरवर मांडले. मिशेल बाईंनी नंतर हे ट्विट काढून टाकले.