आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेलबर्न - भारतीय वंशाची पॉप गायिका आयशा सागरच्या टॉपलेस छायाचित्रांमुळे ऑस्ट्रेलियातील भारतीयांचा एक मोठा वर्ग नाराज झाला आहे. विशेष म्हणजे भारतातील पर्यटन वाढवण्याच्या हेतूने या गायिकेची नुकतीच गोल्ड कोस्ट शहराची सद्भावना दूत म्हणून निवड करण्यात आली होती.
आयशा सागर ही ऑस्ट्रेलियातील पॉप गायिका आहे. क्वीन्सलँडमध्ये येथे ती राहते. गोल्ड कॉस्ट शहराकडे भारतीयांना आकर्षित करण्यासाठी ती लवकरच भारताच्या दौर्यावर येणार आहे, परंतु टॉपलेस छायाचित्रांवरून वाद झाल्याने तिचा हा दौराही संकटात सापडला आहे. भारत दौर्यापूर्वी आयशाची काही छायाचित्रे वेबसाइटवर पोस्ट करण्यात आली आहेत. त्यात तिने तिच्या शरीरावर ऑस्ट्रेलियाचा झेंडा पेंट केला आहे. सर्फस पॅराडाइज बीचवर नृत्य करताना तिला दाखवण्यात आले आहे.
क्वीन्सलँड येथील इंडियन असोसिएशनचे इव्हेंट समन्वयक नीरज नारायण यांनी या चित्रांवर आक्षेप घेतला आहे. ते म्हणतात की, आजही भारतीय रुढीवादी आहेत. त्यामुळे आयशाचे हे अंगप्रदर्शन त्यांना मुळीच रुचणारे नाही. शिवाय आयशाच्या अर्धनग्न छायाचित्रांमुळे गोल्ड कोस्टच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होईल, असे त्यांचे म्हणणे होते. सिडनीतील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. यदू सिंह यांचे विचार मात्र वेगळे आहेत. त्यांच्या मते पर्यटकांना आकर्षित करण्यात याचा परिणाम होणार नाही. बॉलीवूड चित्रपट व ग्लोबल मीडियामुळे भारतीय समाजात बदल झाला आहे. हा समाज दशकापूर्वी होता आता तसा राहिलेला नाही.
ही छायाचित्रे वेबसाइटवर टाकण्यासाठी नव्हती. भारतात करिअरला प्रोत्साहन देण्यासाठी ती होती. या छायाचित्रांचा उद्देश मला एका कलाकाराच्या स्वरूपात सादर करणे हा होता.
आयशा सागर, पॉप गायिका, ऑस्ट्रेलिया
PHOTOS : आयशाची टॉपलेस छायाचित्रे बघून भडकले भारतीय
\'JISM 2\'मध्ये टॉपलेस सनी लियोनबरोबर हीरोचा इंटीमेट सीन
PHOTOS: लियोनार्डोच्या गर्लफ्रेंडने केले टॉपलेस फोटोशूट
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.