आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोपनी स्वत: फोन करून इटालियन ननकडून मोहिमेची माहिती घेतली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक दर्जाचे पोपपद सांभाळल्यानंतर यंदा प्रथमच ख्रिसमसच्या निमित्ताने पोप फ्रान्सिस यांनी जगाला संबोधित केले. साधेपणा आणि माणुसकीसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी पोप बनल्यानंतर व्हॅटिकन सिटीतील आलिशान अपार्टमेंटमध्ये राहण्यास आणि भरजरी कपडे घालण्यास नकार दिला. पोप फ्रान्सिस छोट्या कारमधून रोममध्ये फिरतात आणि फोन कॉलही स्वत: लावतात. ख्रिसमसच्या भाषणाच्या काही वेळ आधी पोपनी नेपल्स येथील शालेय शिक्षिका सिस्टर टेरेसा यांना फोन लावून एका मोहिमेसंदर्भात माहिती विचारली. सेंट अ‍ॅनी यांची मुलगी सिस्टर टेरेसा यांनी नेपल्समधील विषारी कचरा टाकणाºया माफियांविरुद्ध एक मोहीम उघडली आहे. या परिसरातील हजारो लोक कर्करोगामुळे मृत्युमुखी पडत आहेत. यात बालकांचाही बळी जात आहे. पोप फ्रान्सिस यांचा फोन आल्यानंतर सिस्टर टेरेसा खूप खुश झाल्या. पोप स्वत:हून फोन करतील, अशी त्यांना कल्पनाही नव्हती. पोप यांचा फोन आल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला. आता त्या अधिक सक्रिय होऊन ही मोहीम राबवत आहेत.