आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pope Francis Delivers First Sunday Prayers To Crowd Of 2,00,000

पोप फ्रान्सिस यांची पहिली प्रार्थना छोट्याशा चर्चमध्ये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हॅटिकन सिटी - दया आणि क्षमाशीलता हाच प्रभू येशूचा सर्वात मोठा संदेश आहे. क्षमा करण्यास प्रभू कधीही थकत नाही, असा संदेश पोप फ्रान्सिस यांनी आपल्या पहिल्या एंजल्स प्रार्थना सभेत दिला. सकाळी 11 वाजता पापाल अपार्टमेंटच्या खिडकीतून भाषण वाचून दाखवण्याऐवजी उत्स्फूर्त संदेश दिला.

पहिली प्रार्थना छोट्याशा चर्चमध्ये

बुधवारी धर्मगुरूपदी विराजमान झाल्यानंतर रविवारची सकाळची पहिली प्रार्थना त्यांनी व्हॅटिकनमधील सांता अँना चर्चमध्ये केली होती. सेंट पीटर्स चौकातील सभेनंतर त्यांनी धर्मगुरू म्हणून पहिले ट्विट केले. जगभरातील कॅथॉलिक धर्मीयांचे मनापासून आभार मानून माझ्यासाठी प्रार्थना करा, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.