आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pope Francis Gives Catholic Church Hundreds Of New Saints

पोप फ्रान्सिस यांच्याकडून 800 संतांची नावे जाहीर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हॅटिकन सिटी - पोप फ्रान्सिस यांनी ख्रिश्चन समुदायाला 815 नवीन संत दिले आहेत. त्यात 813 इटलीचे आहेत. लॅटिन अमेरिकेतील दोन महिलांना संत घोषित करण्यात आले आहे.

नवीन संताविषयी अधिकृतपणे काहीही स्पष्ट करण्यात आले नाही. मदर तेरेसा यांना संत पद देण्याचा प्रस्ताव अद्याप विचाराधीन आहे. 15 व्या शतकात तुर्की आक्रमणानंतर दबाव टाकूनही धर्मांतर करण्यास नकार देणार्‍या 813 ख्रिश्चन नागरिकांना ठार करण्यात आले होते. पोप फ्रान्सिस यांनी त्या सर्वांना संत म्हणून घोषित केले आहे. लॅटिन अमेरिकेच्या कोलंबियातील स्थानिक लोकांना मदत करणारी महिला त्या देशाची पहिली महिला संत ठरणार आहे. मेक्सिकोमध्ये 1920 च्या दशकात बळजबरी धर्मांतरापासून ख्रिश्चनांना वाचवणार्‍या महिलेसही संत पद देण्यात आले आहे. यासंदर्भातील निर्णय पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी राजीनामा घेण्याच्या अगोदर घेतला होता. त्याची घोषणा पोप फ्रान्सिस यांनी केली.