आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : 20 वर्षांपासून \'लिव्ह इन\'मध्ये राहणा-या 20 जोडप्यांचा पोपच्या उपस्थितीत विवाह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हॅटिकन सिटी - व्हॅटिकन येथे रविवारचा दिवस अत्यंत खास ठरला. पोप फ्रान्सिस यांनी 20 दाम्पत्यांच्या विवाहाचा विधी केला. यापैकी अनेक दाम्पत्ये लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. तर काही सिंगल मदर्स होत्या. विशेष म्हणजे हे सर्व वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमीचे आहेत.

सुमारे 14 वर्षांनंतर व्हॅटिकनमध्ये पोप यांच्या हस्ते विवाहाचा विधी झाला आहे. यापूर्वी लिव्ह इन मध्ये राहणा-या दाम्पत्यांचे सुमारे 2000 विवाह व्हॅटिकनमध्ये करण्यात आले होते. त्यावेळी पोप जॉन पॉल द्वितीय यांनी विवाहाचे विधी केले होते. 18 महिन्यांपूर्वीच पोप बनलेल्या फ्रान्सिस यांनी हे पाऊल उचलत आपली पुरोगामी प्रतिमा आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
पोप या कार्यक्रमांनंतर म्हणाले की, विवाहाचे बंधन हे सोपे नसते. ही जीवनाप्रमाणे सातत्यपूर्ण यात्रा असते. दाम्पत्यांमध्ये वाद होणे साहजिक आहे. तसे नेहमीच होत असले. पण पुढाकार घेऊन ते संपवायला हवे.

पुढील स्लाइड्सवर पाहा कार्यक्रमाचे फोटो...