Home »International »Other Country» Pop's Worship, Vatican City Wintnessed Dovtee's Croud

पोप यांची प्रार्थनासभा; व्हॅटिकन सिटीत भक्तीचा महापूर

वृत्तसंस्‍था | Feb 18, 2013, 07:59 AM IST

  • पोप यांची प्रार्थनासभा; व्हॅटिकन सिटीत भक्तीचा महापूर


व्हॅटिकन सिटी - राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर ख्रिश्चन धर्मगुरू पोप बेनडिक्ट 16वे यांनी सेंट पीटर्स स्क्वेअर चर्चमध्ये भावूक झालेल्या हजारो श्रद्धाळूंना आशीर्वाद दिले. 28 फेब्रुवारी रोजी पोप हे आपले पद सोडत आहे. त्यापूर्वी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जगभरातून भाविक रोममध्ये येत आहेत. प्रार्थनास्थानपासून आपले हात उंचावत सुहास्यवदनाने पोप यांनी श्रद्धाळूंचे अभिवादन केले. चर्चच्या खिडकीतून दर्शन होताच 50 हजारांवर अधिक श्रद्धाळूंनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले.

एमिरेट्स ऑफ बिशप
पोप यांना एमिरेट्स ऑफ बिशप ऑफ रोम उपाधी देण्यात येईल. पोप यांच्या वारसदाराची निवड करण्यासाठी सिस्टिझन चॅपेलमध्ये धर्मगुरूंची बैठक होणार आहे. चर्चच्या गेल्या 16 वर्षांच्या इतिहासात पोप पदाचा राजीनामा देणारे हे पहिलेच धर्मगुरू आहेत.
व्हॅटिकनमध्ये मुक्काम
निवृत्तीनंतर पोप हे व्हॅटिकन सिटी परिसरातच निवास करण्याची शक्यता आहे. यासाठी एक विशेष मठ तयार करण्यात येत असून यात ते एकांतवासात आयुष्य घालवणार आहे.

Next Article

Recommended