आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक्स 10 मिनिटांत चार्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- लिथियम-आयन बॅटरी अ‍ॅनोड्सद्वारे पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक्स दहा मिनिटांत चार्ज करू शकणारे तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी शोधले आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि बोर्नस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगतर्फे लिथियम आयन बॅटरीसाठी शंकूच्या आकाराचे कार्बन नॅनोट्यूब क्लस्टर तयार करण्यात आले.

इलेक्ट्रॉनिक वाहने आणि पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी रिचार्जेबल लिथियम बॅटरी वापरली जाते. ग्रॅफाइट आधारित लिथियम आयन बॅटरी अ‍ॅनोड्सच्या तुलनेत सिलिकॉन अ‍ॅनोड बॅटरीची चार्जिंग क्षमता दहापट जास्त आहे. त्यामुळे ग्रॅफाइट अ‍ॅनोडच्या जागी सिलिकॉन अ‍ॅनोडचा वापर केल्याने सेलची क्षमता 63 टक्क्यांनी वाढते. शिवाय बॅटरी 40 टक्के हलकी व आकारात लहान असते. शास्त्रज्ञांनी यापुढे जाऊन त्रिमितीय शंकू आकाराची सिलिकॉन कार्बन नॅनोट्यूब विकसित केली आहे.