(स्टीव मॅककरी यांनी 2010 मध्ये राजस्थान येथील रबारी जातीच्या एका वृध्दाचा काढलेला फोटो)
जगभरात अनेक असे लोक आहे, ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे. यासाठी ते अत्यंत अवघड ठिकाणी आणि कशाचीही पर्वा नकरता निघून जातात. कोणी वाईल्ड लाईफशी संबंधीत फोटोग्राफी करतो तर कोणी वेगवेगळ्या देशातील संस्कृतींचे फोटो काढतो. विशेष म्हणजे जगभरात अशा फोटोंचा चाहता वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे.
अमेरिकेच्या डार्बी येथे राहाणारे स्टीव मॅककरी हे असेच एक फोटोग्राफर आहेत. स्टीव्हने मागील 30 वर्षात वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन जवळपास 150 पेक्षा जास्त फोटो काढले आहेत. नुकतेच त्यांनी या फोटोंचे प्रदर्शन इटलीत भरवले होते. या प्रदर्शनाचे नाव 'स्टीव मॅककरी: ओल्ट्रे लो स्गुआर्डो' असे होते.
या प्रदर्शनात मॅककरी यांनी वेगवेगळ्या देशातील भिन्न भिन्न जातींच्या संस्कृतींच्या काढलेल्या फोटोंचा समावेश केला होता. मॅककरी म्हणतात की, माझ्यासाठी फोटो म्हणजे एका व्यक्तीला दुसर्या व्यक्तीशी जोडण्याचे साधन आहे. हे संबंध एकदम सरळ आणि भावनापूर्ण असतात.
मॅककरी यांनी घेतलेले फोटो लोकांना खुपच आवडतात. कारण हे फोटो सर्वच धर्मांशी जोडलेले असतात. मॅककरी यांनी भारतासमवेत अनेक देशांमधील संस्कृतींचे फोटो काढले आहेत.
पुढील स्लाईडवर पाहा, मॅककरी यांनी काढलेले वेगवेगळ्या संस्कृतींचे फोटो...