दोन वर्षांपासून इटलीच्या सागरात निपचित पडलेले अवाढव्य कोस्टा कोनकोर्डिया जहाज अखेर बुधवारी धक्क्याला लागले. दोन बोटींनी ‘टो’ करून व 14 बोटींच्या आधारे हे जहाज जिनोआ येथे नेण्यात येत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या जहाजाला सरळ करण्याचे काम सुरू झाले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वात खर्चिक मोहीम होती. हे जहाज आता रविवारपर्यंत जिनोआ बंदरावर पोहोचेल. त्यानंतर ते मोडून भंगारात टाकण्यात येणार आहे. बुधवारी जहाज समुद्रातून मार्गी लागताच मोहिमेत सहभागी झालेल्या कर्मचार्यांनी चिअर्स करून जल्लोष केला. जहाज पाहण्यासाठी गिगलिओ बेटावर गर्दी झाली होती. अनेक लोकांनी त्याचे छायाचित्रही काढून घेतले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, 32 बळी घेणारे हे जहाज सन 2011 मध्ये इटलीच्या गिगलिओ बेटानजीक खडकावर आदळले होते.
(फोटो: 14 बोटींनी टो करून नेताना कोस्टा कोनकोर्डिया जहाज. 25 कि.मी.चा प्रवास हे जहाज करणार आहे. 04 दिवसांनी हे जहाज जिनोआ बंदरावर पोहोचणार आहे.)