आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Possible Life Circle In Mars Over, Curicity Didn't Find Mythen

मंगळ ग्रहावरील संभाव्य जीवसृष्टीच्या आशा फोल,क्युरिऑसिटीला मिथेन सापडला नाही

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - मंगळ ग्रहावर जीवसृष्टी शोधण्यासाठी वर्षानुवर्षे मोहिमा राबवणा-या ‘नासा’च्या आशा फोल ठरल्या. पृथ्वीशी साधर्म्य असलेल्या या ग्रहावर नासाने पाठवलेल्या क्युरिऑसिटी बग्गीला मिथेन वायूचा मोठा अंश सापडला नाही. सूक्ष्म जैविक अस्तित्वाचा मिथेन वायू एक प्रमाण मानला जातो.


गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये क्युरिऑसिटी बग्गी मंगळावर पाठवण्यात आली. मिथेन वायूचा शोध हेच या मोहिमेचे लक्ष्य होते. मात्र, मिथेनचा जो अंश सापडला तो नगण्य आहे. ‘सायन्स’ या विज्ञानविषयक नियतकालिकाने एका ऑनलाइन अहवालात नासाचे शास्त्रज्ञ क्रिस वेबस्टर यांचा हवाला देऊन ही माहिती दिली. वेबस्टर म्हणतात, ‘मिथेन वायू अत्यंत कमी प्रमाणात सापडल्याने यापूर्वीची सर्व निरीक्षणे आता मागे पडत चालली आहेत.’