आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्मिळ टपाल तिकिटाचा एक कोटी डॉलरमध्ये लिलाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिलावगृह सोदबी जून महिन्यात ब्रिटिश गुयानाच्या 1956 च्या एका टपाल तिकिटाचा लिलाव करणार आहे. एक सेंटच्या या तिकिटाचा लिलाव एक कोटी डॉलरपर्यंत जाईल, अशी अपेक्षा सोदबीला आहे. जगातील इतर चार टपाल तिकिटांवर एक नजर..
टपाल कार्यालय मॉरिशस (1847) मॉरिशसने शेकडो अशी टपाल तिकिटे जारी केली आहेत, ज्यांच्यावर पोस्ट पेडऐवजी पोस्ट ऑफिस छापलेले आहे. अशा दोन तिकिटांचा 1993 मध्ये सुमारे 20 लाख डॉलरमध्ये लिलाव झाला.
इन्व्हर्टेड जेनी (1918) अमेरिकेत 1918 मध्ये नियमित एअरमेल सेवा सुरू झाल्याच्या निमित्ताने 24 सेंटच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन घाईघाईत करण्यात आले होते. त्यात एक विमान उलटे दाखवण्यात आले आहे. 2005 मध्ये चार टपाल तिकिटे सुमारे वीस लाखांत विकण्यात आली होती.
स्वीडिश येलो (1855) चुकीच्या छपाईमुळे या तिकिटाचा रंग हिरव्याऐवजी पिवळा झाला होता. या प्रकारच्या एकमेव टपाल तिकिटाचा 1996 मध्ये 23 लाख डॉलरमध्ये लिलाव झाला होता. हे जगातील सर्वात महाग टपाल तिकीट आहे.
बेंजामिन फ्रँकलीन (1868) एक सेंट किमतीची दोन टपाल तिकिटे आजदेखील अस्तित्वात आहेत. 1998 मध्ये एक तिकीट दहा लाख डॉलरमध्ये विकले गेले.