आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इस्लामाबाद - आणखी एक पंतप्रधान अपात्र ठरला तरीही चालेल पण कायदा करण्याचा संसदेचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी न्यायपालिकेसमोर झुकणार नाही असा पक्का इरादा पाकिस्तानी सरकारने केला आहे.
पंतप्रधान, राष्ट्राध्यक्षांसह उच्च पदस्थांना न्यायालयीन अवमान कारवाईपासून संरक्षण देणारा नवा अवमान कायदा शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केला होता.त्यानंतर राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात रात्री उशिरा पाकिस्तानी पीपल्स पार्टी आणि घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली.कायदा करण्याचा घटनात्मक हक्क केवळ लोकप्रतिनिधींनाच आहे.हा हक्क अबाधित ठेवण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी असल्याचे एकमताने मान्य करण्यात आले. विद्यमान कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी भक्कम एकजूट ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
डिसेंबर 2009 मध्ये झरदारींसह 8 हजार लोकांना लाचखोरी,भ्रष्टाचाराच्या खटल्यातून सरसकट माफी देण्यात आली होती.हे सर्व खटले पुन्हा सुरु करण्यात यावे यासाठी न्यायालय पाकिस्तानी सरकारवर दबाव टाकत आहे.परंतु घटनेनुसार राष्ट्राध्यक्षाविरु ध्द देश अथवा परदेशात खटले चालवता येऊ शकत नाही असा पवित्रा सरकारने घेतला आहे. न्यायपालिका व सरकार यांच्यातील संघर्षातील हा कळीचा मुद्दा आहे. झरदारींवर कारवाई करण्याचे टाळल्यामुळे न्यायालयाने युसूफ रझा गिलानींवर अवमान कारवाई करीत अपात्र ठरवले होते.आता नवे पंतप्रधान अशरफ यांच्यामागेही झरदारींवर कारवाई करण्याचा लकडा न्यायालयाने लावला आहे.झरदारींविरुध्द कारवाई सुरु करण्यासाठी स्वित्झर्लंड सरकारला पत्र लिहीण्यासाठी न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यत मुदत दिली आहे.अन्यथा त्यांनाही अपात्र ठरवण्यात येण्याची शक्यता आहे.
इम्रान-शरीफ जुंपली - माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी 6 अब्ज रुपयांचे कर्ज बुडवल्याचा सनसनाटी आरोप माजी क्रिके टपटू आणि तेहरिक ए इन्साफ पार्टीचा प्रमुख इम्रानखान याने केला आहे. शरीफ यांच्या पीएमएल पक्षातील अनेक नेत्यांनी इम्रानवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.त्याला प्रत्त्युतर देताना इम्रानने शरीफ यांच्या करचुकवेगिरी व भ्रष्टाचाराचा पाढाच वाचला.
शरीफ यांनी इस्लामाबाद-लाहोर रस्त्याच्या कामात 160 दशलक्ष अमेरिक ी डॉलर्सचे कमिशन घेतल्याचा आरोप करुन लंडनमध्ये 4.5 अब्ज रुपयांचे चार फ्लॅट खरेदी केले असून हा पैसा त्यांनी कुठून आणला असा सवाल इम्रानने केला आहे.शरीफ यांनी अल तौफीक बँकेकडून 3 कोटी अमेरिकी डॉलर्स कर्ज घेतले होते.हे कर्जही त्यांनी बुडवले असे इम्रान म्हणाला. तत्पूर्वी,कर्करोग रुग्णालयाच्या नावाखाली े गोळा केलेल्या कोट्यवधी रुपयांची इम्रानने इतरत्र गुंतवणूक केल्याचा आरोप पीएमएलच्या नेत्यांनी केला होता.
काय आहेत पर्याय
न्यायालयाच्या निकालास आव्हान देणे
संसदेत पुन्हा अवमान कायदा सादर करणे
झरदारी पदावर असेपर्यंत कारवाई करणार नाही असे पंतप्रधान अशरफ यांनी न्यायालयास निक्षून सांगणे.
पंतप्रधान अपात्र ठरला तरी चालेल; स्वीस सरकारला पत्र लिहिणार नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.