आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरवशाली इतिहास : नेपाळमध्ये अशोक पूर्वकालीन बुद्धविहार सापडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काठमांडू - भगवान गौतम बुद्धांची जन्मभूमी असलेल्या नेपाळमधील लुंबिनीत करण्यात आलेल्या उत्खननात बुद्धविहारासह एका समृद्ध खेड्याचे अवशेष हाती लागले आहेत. बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोकाने तेथे बांधलेल्या विहारांपेक्षाही एक हजाराहून जास्त वर्षे हा स्तूप जुना आहे.


सम्राट अशोकाच्या भेटीच्या आधीच्या लुंबिनीच्या इतिहासावर या उत्खननामुळे प्रकाश पडला आहे. अशोकाच्या आधीच्या काळातील लुंबिनीच्या इतिहासाचा हा भक्कम पुरावा असून जागतिकदृष्ट्या महत्त्वाच्या या स्थळाचे नेपाळ सरकार संवर्धन करणार असल्याचे नेपाळच्या पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव सुशील घिमिरे यांनी म्हटले आहे.
नेपाळमध्ये बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोकाने लुंबिनीत इसवी सनपूर्व तिस-या शतकात दगडी स्तंभ आणि विटांचे बुद्धविहार बांधले होते. आजपर्यंत तेच पहिले बुद्धविहार मानण्यात येत होते. मात्र उत्खननात विहाराचे अवशेष सापडल्यामुळे अशोकाच्या आधीही लुंबिनीत बुद्धविहार बांधण्यात आले होते, हे स्पष्ट होते. 1997 मध्ये युनेस्कोने लुंबिनीला जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे.


असा आहे लुंबिनीचा इतिहास
राजकुमार सिद्धार्थ गौतमचा जन्म लुंबिनीमध्ये झाला. वयाच्या 29 व्या वर्षापर्यंत राजकुमार सिद्धार्थ लुंबिनीमध्येच राहिले. 2500 वर्षांपूर्वी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ते तथागत गौतम बुद्ध झाले. जपानच्या मदतीने चीन लुंबिनीस आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहे.


सम्राट अशोकाच्या आधीच्या काळात बांधलेले बुद्धविहार सापडले. सम्राट अशोकाने त्याचा जिर्णाेद्धार केला. त्यापूर्वी लाकडाचा वापर करून लुंबिनीत विहार बांधले होते. रॉबिन कनिंगहॅम, डरहॅम विद्यापीठ, ब्रिटन.
या दोन उत्खननांमुळे बुद्धांच्या जीवनाचे उगमस्थान आणि लुंबिनीचे धार्मिक महत्त्व यांचा खोलात जाऊन अभ्यास करता येणे शक्य होणार आहे. ’’ आचार्य कर्मा सांगो शेर्पा, लुंबिनी विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष