आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pregnant Woman's Throat Slit In 'honor' Killing In Jordan

ऑनर किलिंग, जॉर्डनमध्ये महिलेचा गळा कापला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमान - गरोदर महिलेची गळा चिरून अमानुष हत्या केल्याची घटना रविवारी पहाटे उजेडात आली. गरोदर असलेल्या महिलेला जाळण्याचाही प्रयत्न झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

या घटनेमुळे जॉर्डनमध्ये खळबळ उडाली आहे. महिलेच्या मृत्यूमागे ऑनर किलिंगचे कारण असू शकते, असा पोलिसांचा अंदाज आहे. अमानच्या पूर्वेकडील रसीफेह भागात हा मृतदेह सापडला. ही महिला चार महिन्यांची गरोदर होती. विशीतील या महिलेच्या पोटातील चार महिन्यांचे अर्भकही घटनेत मृत्यूमुखी पडले आहे. आखाती देशाच्या राजधानीत दरवर्षी 15 ते 20 महिलांची ऑनर किलिंगमधून हत्या होते.