आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • President Barack Obama, Latest News In Divya Marathi

अमेरिका, रशिया दरम्यान प्रतिबंध लावण्याची स्पर्धा सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युक्रेनच्या क्रिमिया भागात रशियाने ताबा मिळवल्यानंतर ओबामा प्रशासनाद्वारे 20 रशियन नागरिकांना आणि एका बँकेवर बंदी घालण्याचा परिणाम होणे साहजिक होते. अमेरिकेने ज्यांच्यावर प्रतिबंध लादला त्यांच्यात अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे चांगल्या मित्रांचा समावेश आहे. अध्यक्ष पुतीन यांचे सर्वात विश्वासू व्लादिमीर याकुनीन या यादीत सर्वात वर आहेत. पुतीन यांनी तात्काळ बंदी घातलेल्या बँकेत आपले खाते उघडले. त्यानंतर रशियाने दोन अमेरिकन सीनेटर रिपब्लिकन जॉन मॅक्केन, डेमॉक्रेटिक मेरी लेंड्रियू यांच्यावर निर्बंध लादले. ओबामांचे वरिष्ठ सल्लागार फीफर रशियाच्या निशाण्यावर आहेत. सर्वप्रथम रशियावर निर्बंधाची धमकी त्यांनीच दिली.