आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बराक ओबामांनी उडवली अनेकांची दिलखुलास टर, ‘येस वुई कॅन’ नव्हे ‘कंट्रोल अल्ट डिलिट’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - जागतिक राजकीय पटलावर सर्वात प्रगत देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची ओळख, परंतु वेळ पडल्यास विनोदबुद्धी दाखवण्याची वाक्बगारीही त्यांच्यात आहे. म्हणूनच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी डिनरच्या निमित्ताने आपल्यातील विनोदवीराचे दर्शन घडवले आणि स्वत: बरोबरच अगदी रशियन अध्यक्ष पुतीन यांच्यावरही कोट्या करून हास्यविनोदाच्या रेवड्या उडवल्या !
अमेरिकेत वादात सापडलेल्या आरोग्यविषयक योजनेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. त्यात तांत्रिक त्रुटी आढळून आल्याने अनेकांना वंचित राहावे लागले होते. त्यावर ओबामांनी आपल्याच प्रशासनाच्या कार्यपद्धतीची स्वत:च टिंगल उडवली. 2008 मध्ये माझे घोषवाक्य होते ‘येस वुई कॅन’. मात्र 2013 मध्ये ते बदलून ‘कन्ट्रोल अल्ट डिलिट’ असे करावे लागेल. व्हाइट हाऊसच्या वतीने दरवर्षी डिनर पार्टी आयोजित करण्यात येते. रविवारी झालेल्या डिनरमध्ये ओबामा यांनी हास्यविनोद केला. डिनरला 2 हजार 500 हून अधिक मान्यवर व्यक्तींची हजेरी होती. त्यात राजकीय पुढारी, अमेरिकी पत्रकारांचा समावेश होता.
युक्रेनवरून रशिया-अमेरिका संबंध ताणल्याच्या पार्श्वभूमीवर नेहमी गंभीर वक्तव्य करणारे ओबामा यांनी डिनरमध्ये मात्र पुतीन यांना नोबेल शांतता पुरस्कार समितीचे अध्यक्षपद देऊन टाका. कारण अलीकडे हे पद कोणालाही दिले जात आहे, असे सांगितले. त्यावर उपस्थितांमध्ये चांगलीच खसखस पिकली. ओबामा यांच्या दुसºया इनिंगचा निम्मा कार्यकाळ संपला आहे. मला काही लोक म्हणतात. तुमचा कार्यकाळ फारच कमी ठरेल. पण मला तर तो खूप वाटतो, असे ते म्हणाले.
टीव्हीचा ‘समाचार’
ओबामा यांनी फॉक्स न्यूजचाही ‘समाचार’ घेतला. हिलरी क्लिंटन 2016 ची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी फॉक्सला त्यांना विरोध करणे अवघड जाईल. मी गेल्यानंतर तुम्ही मला मिस कराल. कारण हिलरी केनियामध्ये जन्मल्या आहेत.
रिपब्लिकनचीही टर..
विरोधी पक्षाने ओबामा केअर योजनेला जोरदार विरोध केला होता. तो सूर पकडून ओबामा म्हणाले, रिपब्लिकनचे माझे सहकारी सध्या खरोखरच खूप व्यग्र आहेत. त्यांनी ओबामा केअरसंबंधी जवळपास 50 वेळा काँग्रेसमध्ये अडथळे आणले.