आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • President Obama’s 2016 Budget Draws Praise, Criticism From Women’s Health Advocates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संसदेने आरोग्य विमा विधेयक फेटाळले, ओबामा यांना झटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - देशभरात आरोग्य सुरक्षा विमा योजना(ओबामा हेल्थकेअर) लागू करण्याच्या राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या महत्वाकांक्षी योजनेला बुधवारी जबर धक्का बसला. ओबामांनी ‘व्हेटो’वापरण्याचा इशारा देऊनही अमेरिकेतील कनिष्ठ सभागृहाने (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह) हे विधेयक रद्द ठरवले. याबाबतचा प्रस्ताव १८६ विरुद्ध २३९ मतांनी नामंजूर झाला. आता हा प्रस्ताव सिनेटमध्ये मांडला जाणार आहे, परंतु तेथेही तो नामंजूर होण्याची शक्यता आहे.

जर काँग्रेसने (अमेरिकन संसद) हेल्थ केअर प्रोजेक्ट मंजूर केल्यास राष्ट्रपती व्हेटोचा वापर करतील, असा इशारा ओबामा प्रशासनाने दिला होता. सध्या अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांत ओबामांची पार्टी रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे. २०१० पासून लागू असलेल्या ओबामा केअर प्रस्तावाला हाऊसमध्ये रिपब्लिकन पक्ष सात्याने विरोध करत तो नामंजूर करत आहे. त्यामुळे अनेकवेळा हा प्रस्ताव फेटाळला गेला आहे. पण त्यावरून मतभेद कायम आहेत. दरम्यान राष्ट्रपती बराक ओबामांनी मतदानाआधी ज्यांना ओबामाकेअरचा लाभ मिळणार आहे अशा लोकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

प्रकरण सर्वोच्च न्यायालयात
खासदारांचे म्हणणे असे की, याऐवजी सरकारने नवा प्रस्ताव सादर करावा. अमेरिकेतील ३७ राज्यांना ओबामा केअर अंतर्गत केंद्र सरकारकडून अनुदान मिळण्याचे प्रकरण याआधीच सर्वोच्च न्यायालयात दाखल असून ते प्रलंबित आहे. त्यावर जूनमध्ये निर्णय येणे अपेक्षित आहे. ओबामा केअरचे समर्थ करणार्‍यांचे म्हणणे असे की, सर्वोच्च न्यायालयाने हा कायदा रद्द करावा यासाठी रिपब्लिकन पक्ष दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी हे करत आहे.