आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युक्रेनमधील मतदानात बंडखोरांकडून अडथळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किव्ह - अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर रविवारी युक्रेनमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. पहिल्या सात तासांमध्ये 38 टक्के मतदानाची नोंद झाली, परंतु बंडखोरांनी पूर्वेकडील मतदान केंद्रे बंद पाडली होती.
रशियाने क्रिमियावर ताबा घेतल्यापासून सोव्हिएत संघाचा एकेकाळचा देश राहिलेल्या युक्रेनचे आपले सार्वभौमत्व राखण्यासाठी हे प्रयत्न आहेत. देशाच्या इतर भागातील मतदान शांततेत पार पडले, मात्र पूर्वेकडे मात्र रशियन सर्मथकांनी मतदान प्रक्रियेत अडथळा आणल्याने तेथे ही प्रक्रिया स्थगित करावी लागली होती. मतदान करणे महत्त्वाचे आहे. त्यातूनच देशातील सर्व नागरिकांसाठी शांतता निर्माण होऊ शकेल, असे अब्जाधीश पेट्रो पोरोशेंको यांनी सांगितले. युक्रेन हा वेगळा देश बनला आहे. आता आम्ही त्यात का म्हणून सहभागी व्हावे, असा सवाल डॉनेस्टक येथील एका महिलेने विचारला. बंडखोरांनी निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणार असल्याची धमकी दिली होती. फुटीरतावादी प्रदेशात 34 पैकी केवळ 11 मतदारसंघांतच मतदान होऊ शकले, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रशियन समर्थक गटाकडून सार्वमत आजमावल्याच्या दोन आठवड्यांनंतर येथे निवडणूक घेण्यात आली आहे. दरम्यान, पाश्चात्त्य देश युक्रेनमधील स्थितीकडे व रशियन घडामोडींकडेदेखील बारकाईने पाहत आहेत.