आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pressure Cooker Lid Recovered From Boston Blasts Site

बोस्टन स्फोट: जनतेकडून मिळाले 2000 धागेदोरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- बोस्टन मॅरेथॉनदरम्यान झालेल्या दुहेरी स्फोटाबाबत अद्याप कोणावरही संशय व्यक्त करण्यात आला नाही. तपास अधिका-यांच्या आवाहनानंतर जनतेने आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी 2000 धागेदोरे दिले आहेत. पोलिस याच धर्तीवर तपास करत आहेत. दरम्यान, मृतातील तिसरा व्यक्ती चीनी असल्याचे समोर आले आहे. एका स्फोटासाठी प्रेशर कुकरचा वापर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये खिळे, स्फोटक पदार्थ आणि बॉल बिअरिंग भरलेले होते. जवळच्या इमारतीच्या छतावर उडून गेलेले कुकरचे झाकण सापडले आहे. मात्र, दुसरा स्फोट कसा झाला हे दुस-या दिवशीही कळू शकले नाही.