आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमोहनसिंगांच्या डिनरला अचानक कोल्ह्याची एंट्री; थरारामुळे डिनर हुकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन- द्विपक्षीय चर्चेसाठी र्जमनी दौर्‍यावर असलेले पंतप्रधान मनमोहन सिंग यांना डिनर टाळावे लागले. चान्सलर अँजेला मार्केल यांनी हे रात्रीभोजन आयोजित केले होते. परंतु डिनरच्या काही वेळ अगोदर कोल्ह्याने चान्सलरीमध्ये प्रवेश केला आणि काही क्षणांसाठी थरार उडवून दिला.
चान्सलरच्या कार्यालय परिसरात कोल्होबाने अचानक एंट्री मारल्याने सुरक्षा रक्षक चकित झाले. तो कोठून आला हेच त्यांना कळायला मार्ग नव्हता. हा कोल्हा कार्यालयाच्या परिसरात भटकला आणि काही मिनिटांत स्वत:हून निघूनही गेला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कोल्हा निघून गेल्यानंतर नियोजित डिनरला मात्र सिंग यांनी हजेरी लावली नाही. परंतु वाणिज्यमंत्री आनंद शर्मा, पंतप्रधानांचे मुख्य सचिव पौलोक चॅटर्जी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन, पंतप्रधानांचे खासगी सचिव विक्रम मिस्री यांनी या भोजनाचा आनंद घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. काही क्षणासाठी आलेल्या कोल्होबामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यात पंतप्रधानांचे डिनर मात्र हुकले.
पुढे वाचा, भारत- जर्मनी यांच्यातील द्विपक्षीय संबंधातील माहिती व कराराबाबत....