आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prince Andrew Denies Allegations In Underage Sex

ब्रिटीश प्रिंस अँड्रयूवर लैंगिक शोषणाचा आरोप, अल्पवयीनवर ब्रिटन-अमेरिकेत केले अत्याचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटीश महाराणी एलिझाबेथ यांचा मुलगा प्रिंस अँड्रयूवर लैँगिक शोषणाचा आरोप झाला आहे. एका महिलेने अमेरिकेच्या कोर्टात अनेक पुरावे सादर करत आरोप केला आहे, की ती अल्पवयीन असताना प्रिंस अँड्रयू यांनी तीन वेळा तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले होते. ब्रिटीश राजघराण्याने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. मात्र, महिलेचा आरोप आहे, की ती जेव्हा 17 वर्षांची होती तेव्हा प्रिंस अँड्रयू यांनी ब्रिटनमध्ये एकदा आणि अमेरिकेत नेऊन दोन वेळा तिच्यावर अत्याचार केला. महिलेने दाखल केलेल्या खटल्यात प्रमुख आरोपी प्रिंस अँड्यू यांचा मित्र जॅफ्रे अॅप्सटी आहे.
बंकिंगहम पॅलेसने आरोप फेटाळले
बंकिंगहम पॅलेस कार्यालय सहसा अशा प्रकरणांमध्ये स्पष्टीकरण देत नाही, मात्र महिलेने प्रिंस अँड्रयू यांच्यावर केलेल्या आरोपानंतर बंकिंगहम पॅलेसने स्पष्टीकरण देत हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. स्वस्तात लोकप्रियता मिळविण्यासाठी असे आरोप केले जात असल्याचे त्यात म्हटले आहे. काळ हेच या आरोपांवरती उत्तर असते, असे म्हणत बंकिंगहम पॅलेसने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे, की जसा वेळ निघून जातो तसे हे आरोपही मिटतात.
प्रिंस अँड्रयू यांच्यावर आरोप करणार्‍या महिलेने फ्लोरिडा येथील कोर्टात खटला दाखल केला आहे. 1999 ते 2002 या काळात लैंगिक शोषण झाल्याचे महिलेने म्हटले आहे. जॅफ्रे याने महिलेवर प्रिंस अँड्रयूसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केल्याचे आरोपात म्हटले आहे. या प्रकरणात एका वकीलासह आणखी काही लोक आहेत आणि हे सर्व जॅफ्रेचे मित्र आहेत.

फोटो - प्रिंस अँड्रयू आणि त्यांचा मित्र जॅफ्रे