आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Prince Charles Had Doubts About Marrying Princess Diana: Book

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रिन्स चार्ल्सना विवाहाच्या एक दिवसापूर्वी डायनाशी तोडायचे होते नाते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंदन - एका नव्या पुस्तकात करण्यात आलेल्या दाव्यानुसार ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स हे प्रिन्सेस डायनाशी विवाह करण्याच्या एक दिवस अगोदर या विवाहाच्या निर्णयाबाबात संभ्रमावस्थेत होते. प्रिन्स चार्ल्स यांच्याशी संबंधित एका आत्मचरित्रात हा दावा करण्यात आला आहे. त्यावेळी चार्ल्स यांनी या नात्याला आणखी वाढवण्याची इच्छा नसल्याचे त्यांच्या एका नीकटवर्तीय व्यक्तीला म्हटले होते.
(संग्रहित छायाचित्र)

या पुस्तकात असाही दावा करण्यात आला आहे की, प्रिन्स चार्ल्स यांनी त्यावेळी डायनाशी संबंध तोडण्याचा विचार सुरू केला होता. ही घटना प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांच्या एका दिवसापूर्वीची म्हणजे जुलै 1981 मधील असल्याचेही पुस्तकात म्हटले आहे. डायना आणि प्रिन्स यांनी साखरपुड्यानंतर सुमारे पाच महिन्यांनी विवाह केला होता.

कॅथरीन मेयर यांचे पुस्तक ‘चार्ल्स : हार्ट ऑफ द किंग’ मध्ये असे म्हटले आहे की, प्रिन्स चार्ल्स आणि राजकुमारी डायना दोघेही वेगवेगळ्या कारणांमुळे हा विवाह तोडण्याचा विचार करत होते. ‘द टेलीग्राफ’ च्या एका वृत्तानुसार, पुस्तकात असे म्हटले आहे की, प्रिन्सचा ओढा कॅमिला पारकर बालेस हिच्याकडे असल्याचे डायनाला माहिती होते. तर ज्या मुलीला व्यवस्थितपणे ओळखतही नाही, तिच्याशी विवाह करावा लागत अशल्याची भावना प्रिन्स चार्ल्स यांच्या मनात होती.

कॅथरीन मेयर यांनी लिहिलेले हे आत्मचरित्र गुरुवारी प्रकाशित होणआर आहे. मेयर यांनी केलेल्या दाव्यानुसार प्रिन्स चार्ल्सने डायना यांच्या खासगी समस्यांकडे सुरुवातीला फारसे लक्ष दिले नाही. मात्र नंतर त्यांना अशी जाणीव झाली की, डायना यांचे व्यक्तिमत्त्व हे अत्यंत गुंतागुंतीचे आहे.