आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prince Charles Wearing A Traditional Saudi Uniform

प्रिंस चार्ल्स यांची अरबी शैली, पारंपरिक पद्धतीने हातात तलवार घेऊन केले नृत्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौदी अरबच्या एका कार्यक्रमात प्रिंस ऑफ वेल्स यांचे एक अनोखे रूप पाहायला मिळाले. हातात तलवार घेऊन शेख लोकांसारखा वेश परिधान करून प्रिंस चार्ल्स अरबी संस्कृतीचा भाग बनण्याचा प्रयत्न करत होते. राजधानी रियादमध्ये जनाद्रियाह नावाचा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमात सौदीच्या शाही कुटूंबियांसोबत प्रिंस चार्ल्स सहभागी झाले होते.

यावेळी चार्ल्स यांनी पारंपरिक पोशाख परिधान केला होता. हातात तलवार घेऊन अर्दाह नृत्यातही ते अरबी लोकांमध्ये सहभागी झाले. हा फेस्टीव्हल 17 दिवस सुरू राहणार आहे. राजकुमार मुकरिन बिन अब्दुल अजीज यांनी प्रिंस चार्ल्स यांच्या सन्मानार्थ ही मेजवाणी दिली होती. राजकुमार नुकरिन यांनी सौदी गुप्तचर विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले आहे.

मिडल इस्टच्या दौऱ्यावर असणारे चार्ल्स चौथ्या दिवशी सौदीमध्ये पोहोचले. कॉमवेल्थच्या आग्रहाखातर प्रिंस चार्ल्स यांनी सौदी अरब आणि कतारचा दौरा केला. चार्ल्स यांचा सौदी अरबचा हा दाहावा अधिकृत दौरा आहे.

काय आहे अल-जिनद्रियाह मोहत्सव?
अल -जिनाद्रियाह हा सौदी अरबचा पारंपरिक सांस्कृतिक महोत्सव आहे. हा महोत्सव दरवर्षी सौदी अरबची राजधानी रियादमध्ये साजरा केला जातो. नॅशनल गार्डच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यात ऊंटांची शर्यत, स्थानिक नृत्त्य आणि संगित याचे अनेक कार्यक्रम घेतले जातात. लाखोंच्या संखेने लोक या महोत्सवात सहभागी होतात.

प्रिंस चाल्स यांच्या अरबी स्टाइलचे काही निवडक फोटो पाहा पुढील स्लाइडवर...