आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅगझिनचा अगोचरपणा : प्रिन्स-केट ‘हनिमून’ चित्रांमुळे खळबळ, राजघराणे संतापले!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ब्रिटनचे शाही दांपत्य राजकुमार विल्यम्स आणि डचेसऑफ केंब्रिज केट यांची समुद्रावरील छायाचित्रे एका ऑस्ट्रेलियन मॅगझिनमध्ये प्रकाशित झाल्यामुळे ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे, तर शाही जोडप्याची हनिमूनची छायाचित्र प्रकाशित न करण्याच्या अलिखित कराराचा भंग केल्यामुळे ब्रिटीश राजघराणे संतापले आहे.
‘वुमन्स डे’ या ऑस्ट्रेलियातील मॅगझिनने हा अगोचरपणा केला आहे. ड्यूक आणि डचेस गतवर्षी सेशेल्स येथे हनिमूनला गेले होते. दहा दिवसांच्या अत्यंत खासगी दौ-याचे एकही छायाचित्र प्रकाशित करायचे नाही, असा अलिखित करार आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था, संघटनांनी केला होता; परंतु वर्षभरानंतर ऑस्ट्रेलियन मॅगझिनने ही अनधिकृत छायाचित्रे येत्या 16 जुलै रोजी प्रकाशित होणा-या अंकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. ड्यूक आणि डचेस हे दोघे समुद्रकिना-यावरून हातात हात घालून जातानाचे हे छायाचित्र असून यामध्ये डचेस केंट ही बिकिनीवर आहे. याशिवाय मॅगझिनमध्ये जोडप्याची 15 छायाचित्रे असून त्यात हे दोघे समुद्रातील पाण्यात पहुडलेले दिसतात. ‘अवर आयलंड पॅराडाइज’ (आमचे स्वर्गीय बेट) अशा आशयाचा मथळा मुखपृष्ठावर देण्यात आला. जणूकाही ही छायाचित्रे प्रसिद्ध करण्यासाठी त्यांची संमती आहे म्हणून या आशयाचा मथळा देण्यात आला असल्याचे भासवण्यात आले आहे.
गतवर्षी 29 एप्रिल रोजी राजकुमार विल्यम आणि केट मिडलटन यांचा शाही विवाह सोहळा पार पडला होता. ही छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यामुळे दोघेही अत्यंत नाराज झाले आहेत. विवाह समारंभ अत्यंत दणक्यात आणि हजारो लोकांच्या साक्षीने झाल्यामुळे आपल्या खासगी आयुष्यात कुणीही लुडबूड करू नये, अशी या शाही दांपत्याची रास्त अपेक्षा होती. त्यामुळेच त्यांनी मीडियालाही तशी विनंती केली होती. असे सेंट जेम्स राजमहालाच्या प्रवक्त्याने सांगितले.
सन 1997 मध्ये राजकुमारी डायना म्हणजेच प्रिन्स विल्यम्सची आई हिचा छायाचित्रकारांचा ससेमिरा मागे लागल्यामुळेच पॅरिसमध्ये अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळेच ड्यूक ऑफ केंब्रिज अर्थात प्रिन्स विल्यम्स आपल्या पत्नीला प्रसिद्धी माध्यमांपासून दूर ठेवण्याचाच प्रयत्न करतो.
तटरक्षकांना चुक वून छायाचित्रे- नवविवाहित दांपत्याला एकांत मिळावा म्हणून या दौ-यात प्रत्येक ठिकाणी अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. सेशेल्सच्या बीचवर तटरक्षक दलाचे जवान डोळ्यात तेल घालून पहारा देत होते. एवढी काळजी घेऊनही कुणी तरी अज्ञात छायाचित्रकाराने लाँग लेन्सचा वापर करून ही छायाचित्रे गुपचूप काढली.